• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sports tournament affected by covid 19 pandemic in world psd

करोनामुळे क्रीडाविश्व घायाळ

Updated: September 10, 2021 14:27 IST
Follow Us
  • करोनामुळे क्रीडाविश्व घायाळ
    1/18

  • 2/18

    विषाणूचा सामना करण्यासाठी बहुतांश देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं, ज्याचा फटका साहजिकपणे अर्थव्यवस्थेलाही बसला. जगभरातील क्रीडास्पर्धाही या विषाणूमुळे रद्द करण्यात आल्या.

  • 3/18

    जगभरातील परिस्थिती करोनामुळे गंभीर बनली आहे. (संग्रहित छायाचित्र)

  • 4/18

    बास्केटबॉल मध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेली NBA या स्पर्धेचं वेळापत्रक बदलत ३१ जुलैपासून ही स्पर्धा सुरु करण्यात येणार आहे. मात्र महिला खेळाडूंसाठीची स्पर्धा आयोजकांनी पुढे ढकलली आहे.

  • 5/18

    यंदाची बास्केटबॉल Euro Cup स्पर्धा मात्र रद्द करण्यात आली आहे.

  • 6/18

    फुटबॉल क्षेत्रालाही करोनाचा फटका बसला होता, परंतू जर्मन सरकारने पहिलं पाऊल उचलत Bundesliga या पहिल्या प्रथितयश स्पर्धेला मान्यता दिली. यानंतर La Liga, EPL यासारख्या स्पर्धांना सुरुवात झालेली असून, Euro 2020, Copa America, Champions League या स्पर्धा आयोजकांनी पुढे ढकलल्या आहेत.

  • 7/18

    टेनिसमध्ये यंदाची विम्बल्डन स्पर्धा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. प्रदीर्घ कालावधीनंतर ही स्पर्धा पहिल्यांदाच रद्द करण्यात आली.

  • 8/18

    दुसरीकडे फ्रेंच ओपन स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून ही स्पर्धा आता २७ सप्टेंबर पासून खेळवण्यात येईल.

  • 9/18

    अमेरिकन ओपन स्पर्धेच्या आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ३१ ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात होईल.

  • 10/18

    जगातली सर्वात कठीण सायकल स्पर्धा म्हणजेच टूर द फ्रान्स या स्पर्धेलाही करोनाचा फटका बसला आहे. सर्व नियमांचं पालन करत या स्पर्धेचं आयोजन आता २९ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे.

  • 11/18

    जपानच्या टोकियो शहरात होणारी ऑलिम्पिक स्पर्धाही वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे.

  • 12/18

    आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेनेही आपल्या सर्व स्पर्धा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलल्या आहेत, मात्र खेळाडूंना सरावाची परवानगी देण्यात आली आहे.

  • 13/18

    आता वळूया क्रिकेटकडे, न्यूझीलंड दौऱ्यावरुन परतलेल्या भारतीय संघाला करोनाचा पहिला फटका मायदेशात सहन करावा लागला. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ३ सामन्यांची मालिका बीसीसीआयने पुढे ढकलली.

  • 14/18

    यानंतर आयपीएलचा तेरावा हंगामही करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला.

  • 15/18

    दरम्यानच्या काळात आयसीसीने खेळाडूंना सरावाची परवानगी दिली. पण करोनामुळे जगभरातली परिस्थिती पाहता बीसीसीआयने भारतीय संघाचा श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौराही रद्द केला.

  • 16/18

    २०२० सालात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेली २ कसोटी सामन्यांची मालिका ही यंदाच्या हंगामातली पहिली आणि आतापर्यंतची अखेरची मालिका ठरली. यानंतर करोना विषाणूमुळे इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड या कसोटी मालिका रद्द करण्यात आल्या.

  • 17/18

    करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीत ४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. परंतू यादरम्यान होणारं आर्थिक नुकसान लक्षात घेता आयसीसीने आंतरराष्ट्रीय सामन्यांना परवानगी दिली.

  • 18/18

Web Title: Sports tournament affected by covid 19 pandemic in world psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.