-
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि इंग्लडंमधील काऊंटी क्रिकेट स्पर्धेत वूस्टरशर संघासाठी खेळणारा अष्टपैलू खेळाडू अॅलेक्स हेपबर्नला न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायलयाने हेपबर्नला बलात्कार प्रकरणात दिलास देण्यास नकार दिला आहे.
-
मागील वर्षी म्हणजेच २०१९ साली एप्रिल महिन्यामध्ये हेपबर्नला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर अॅलेक्सने वूस्टरशर क्राउन कोर्टमध्ये कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाविरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी १ जुलै रोजी झाली.
-
वूस्टरशर क्राउन कोर्टाने हेपबर्नला सुनावण्यात आलेली शिक्षा योग्य असल्याचे सांगत ती कायम ठेवली आहे. त्यामुळे आता हेपबर्नला पाच वर्ष तुरुंगामध्ये काढावी लागणार आहेत. २४ वर्षीय हेपबर्नने झोपेत असणाऱ्या एका महिलेवर बलात्कार केला होता.
-
१ एप्रिल २०१७ रोजी अॅलेक्स हेपबर्नने हे कृत्य केलं होतं. कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान हेपबर्नने व्हॉट्सअपवर ग्रुपवरील एका सेक्शुअल गेममध्ये देण्यात आलेल्या आव्हानानंतर बलत्कार केल्याचे सांगितले.
-
व्हॉट्सअफवरील या गेममध्ये एका ठराविक तारखेपर्यंत हेपबर्नने जास्तीत जास्त महिलांबरोबर शरीरसंबंध ठेवावेत असं चँलेंज देण्यात आलं होतं.
-
हेपबर्नने व्हॉट्सअपवर देण्यात आलेलं हे आव्हान स्वीकारले. मात्र चॅलेंज पूर्ण करण्यासाठी हेपबर्नने त्याचा सहकारी असणाऱ्या जो क्लार्कच्या प्रेयसीवरच बलात्कार केला.
-
-
हेपबर्नने पिडित तरुणीवर जबरदस्ती करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप न्यायालयामध्ये साक्षी पुराव्यांसहीत सिद्ध झाला. (फोटो सौजन्य: टेलीग्राफ)
-
पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये जन्म झालेला हेपबर्नला लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये रस होता. त्यासाठीच तो २०१३ साली इंग्लंडला गेला. तिथेच काही वर्षात त्याने चांगले नाव कमावलं होतं.
-
आता वयाच्या २४ व्या वर्षी बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवण्यात आल्याने हेपबर्नचे करियर संपल्यात जमा आहे.
व्हॉट्सअॅप चॅलेंजसाठी क्रिकेटपटूने सहकाऱ्याच्या गर्लफ्रेण्डवर केला बलात्कार; पाच वर्षांसाठी गेला तुरुंगात
ही तरुणी झोपेत असताना तो तिच्या जवळ गेला आणि…
Web Title: Cricketer alex hepburn jailed for five years for raping woman scsg