-
कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा पारंपरिक प्रकार मानला जातो.
-
कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या संघाचं प्रतिनिधीत्व करायला मिळावं असं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं.
-
कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावलं हे प्रत्येक फलंदाजासाठी मानाची गोष्ट समजली जाते.
-
परंतू कधीकधी गोलंदाजही कसोटी क्रिकेटमध्ये भाव खाऊन जातात. आज आपण कसोटीत शतक झळकावणाऱ्या ३ भारतीय गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत.
-
१) अजित आगरकर – २००२ साली लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध मराठमोळ्या अजित आगरकरने नाबाद १०९ धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमधलं अजित आगरकरचं हे पहिलं आणि एकमेव शतक होतं.
-
२) अनिल कुंबळे – फिरकीपटू म्हणून ओळख असलेल्या अनिल कुंबळेनेही इंग्लंडविरुद्ध शतकी खेळीची नोंद केली होती. द ओवल च्या मैदानावर खेळत असताना कुंबळेने नाबाद ११० धावा केल्या होत्या.
-
३) हरभजन सिंह – हरभजन सिंहने आपल्या कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत दोन शतकं झळकावली आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ही दोन्ही शतकं हरभजनने न्यूझीलंडविरुद्ध झळकावली आहेत. २०१० साली अहमदाबाद कसोटीत दुसऱ्या डावात हरभजनने ११५ तर हैदराबाद कसोटीत नाबाद १११ धावांची खेळी केली होती.
कसोटीत शतक झळकावणारे ३ भारतीय गोलंदाज, एक खेळाडू आहे अस्सल मराठमोळा
Web Title: 3 indian bowlers who score century in test cricket psd