-
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाला नुकतच २१ व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान खेळाडू ठरवण्यात आलं. विस्डनने जाडेजाला हा बहुमान दिला आहे.
-
संघात अनेक महत्वाचे खेळाडू असताना रविंद्र जाडेजाची या बहुमानासाठी निवड कशी झाली असा प्रश्न अनेकांना पडला असेल…
-
पण गेल्या काही वर्षांतली जाडेजाची आकडेवारी पाहता, त्याची या बहुमानासाठी झालेली निवड ही योग्यच आहे हे तुम्हालाही पटेल, पाहुयात जाडेजाला का मिळाला हा बहुमान??
-
फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच जाडेजा हा भारताचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, यात कोणाच्याही मनात शंका नसेल. २०१९ विश्वचषकात रविंद्र जाडेजाला केवळ २ सामने आणि एका सामन्यात बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली. तरीही या सामन्यांत रविंद्र जाडेजा सर्वाधिक धावा वाचवणारा खेळाडू ठरला.
-
विश्वचषकात २ सामन्यांत मिळून जाडेजाने तब्बल ४१ धावा वाचवल्या. इतर देशातील खेळाडूंनी ७-९ सामने खेळूनही त्यांना जाडेजासारखी कामगिरी करणं जमलं नाही.
-
केवळ ४९ कसोटी सामन्यांमध्ये जाडेजाने १५०० धावा आणि २०० बळी अशी कामगिरी केली आहे.
-
२०१८ साली फारशी संधी न मिळालेल्या रविंद्र जाडेजाला २०१९ मध्ये विराट कोहलीने कसोटी संघात संधी दिली आणि जाडेजानेही गोलंदाजीसोबत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना या संधीचं सोनं करुन दाखवलं.
-
२०१८ पासून कसोटी क्रिकेटमध्ये केवळ १९ डावांमध्ये फलंदाजीत रविंद्र जाडेजाना सुधारणा करत आपली सरासरी २९.४० वरुन ३५.२६ वर नेऊन ठेवली आहे.
-
१९ डावांपैकी १८ डावांत जाडेजाने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, ज्यामुळे अखेरच्या फळीतला भारताचा भरवशाचा फलंदाज म्हणून जाडेजाने आपलं स्थान पक्क केलं. घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध मालिकेत जाडेजाने सलग ३ डावांत अर्धशतकं झळकावली.
-
नवीन वर्षात न्यूझीलंड दौऱ्यात कसोटी मालिकेत भारताची कामगिरी खराब झाली. तरीही रविंद्र जाडेजाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करत फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आपली चमक दाखवली. याच कारणांसाठी जाडेजाची भारताचा सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
…म्हणून रविंद्र जाडेजा ठरला भारताचा मौल्यवान खेळाडू
Wisden कडून जाडेजाचा सन्मान
Web Title: What makes ravindra jadeja indias most valuable test cricketer of the 21st century psd