Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. happy birthday sunil gavaskar%e2%80%89five interesting facts from former india captains historic career psd

Happy Birthday SMG ! गावसकरांविषयीच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का??

Updated: September 10, 2021 14:25 IST
Follow Us
  • भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि मराठमोळे फलंदाज सुनिल गावसकर आज आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. कसोटीत १० हजारांपेक्षा जास्त धावा आणि असे अनेक विक्रम गावसकरांनी आपल्या कारकिर्दीत केले. (सर्व छायाचित्र सौजन्य - ICC Twitter Handel)
    1/7

    भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि मराठमोळे फलंदाज सुनिल गावसकर आज आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. कसोटीत १० हजारांपेक्षा जास्त धावा आणि असे अनेक विक्रम गावसकरांनी आपल्या कारकिर्दीत केले. (सर्व छायाचित्र सौजन्य – ICC Twitter Handel)

  • 2/7

    आजच्या दिवशी आपण गावसकर यांच्या कारकिर्दीतल्या अशा काही गोष्टी माहिती करुन घेणार आहोत, ज्या कदाचीतच तुम्हाला माहिती असतील.

  • 3/7

    १) विंडीजविरुद्ध कसोटीत १३ शतकं – विंडीजचा संघ याआधी क्रिकेटमधला दादा संघ मानला जायचा. माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग, सर अँडी रॉबर्स यांच्यासारखे दिग्गज गोलंदाज अक्षरशः तोफेतून गोळे सुटावेत तशी गोलंदाजी करायचे. मात्र गावसकरांनी आपल्या काळात विंडीजच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत, तेरा शतकं झळावली. एखाद्या भारतीय फलंदाजाने एका प्रतिस्पर्ध्याविरोधात झळकावलेली ही सर्वाधिक शतकं आहे. सर डॉन ब्रॅडमन यांनी विंडीजविरोधात १९ शतकं झळकावली. गावसकर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.

  • 4/7

    २) पदार्पणाच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा – १९७१ साली गावसकर यांनी विंडीजविरोधात कसोटी मालिकेत पदार्पण केलं. ४ सामन्यांच्या मालिकेत गावसकर यांनी तब्बल ७७४ धावा केल्या होत्या. कसोटी पदार्पणातच गावसकर यांनी आपली चमक दाखवून दिली होती.

  • 5/7

  • 6/7

    ४) कसोटीत १० हजार धावा पूर्ण करणारे पहिले फलंदाज – ७ मार्च १९८७ रोजी गावसकरांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा विक्रम केला. दहा हजार धावांचा टप्पा गाठणारे गावसकर पहिले फलंदाज ठरले. आपल्या १२४ व्या कसोटी सामन्यात गावसकरांनी ही कामगिरी केली. महत्वाची गोष्ट म्हणजे हा सामना भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता.

  • 7/7

    ५) सामन्यादरम्यान हेअरकट – इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे कसोटी सामन्यादरम्यान सुनिल गावसकर यांनी आपले केस कापले होते. मैदानात सुटलेल्या वाऱ्यामुळे गावसकरांचे केस सतत त्यांच्या डोळ्यावर येत होते. ज्यामुळे फलंदाजी करताना त्यांना त्रास होत होता, यावेळी त्यांनी पंच डिकी बर्ड यांना आपले केस कापण्याची विनंती केली. पंच बर्ड यांनीही कैची मागवत गावसकरांचे केस कापले. या सामन्यात गावसकरांनी १०१ धावांची खेळी केली. परंतू भारत या सामन्यात विजयी होऊ शकला नाही.

Web Title: Happy birthday sunil gavaskar%e2%80%89five interesting facts from former india captains historic career psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.