-
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात मँचेस्टर येथे पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद चक्क वॉटरबॉय बनून मैदानात आल्यामुळे अनेक पाकिस्तानी चाहते आणि माजी खेळाडू यांनी नाराजी व्यक्त केली. (फोटो – ट्विटर)
-
पाकिस्तानला चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या कर्णधाराला अशी वागणूक देणं बरोबर नाही असा पाकिस्तानी चाहत्यांमध्ये सूर होता. या निमित्ताने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेले कर्णधार जेव्हा वॉटरबॉय बनून मैदानात येतात ते क्षण पाहणार आहोत. (फोटो सौजन्य – एपी)
-
१) महेंद्रसिंह धोनी – २०१२ साली श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तिरंगी मालिकेदरम्यान धोनीवर स्लो-ओव्हर रेटमुळे एका सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. यानंतरच्या सामन्यात धोनी आपल्या सहकाऱ्यांसाठी एनर्जी ड्रिंक्स घेऊन मैदानात आलेला पहायला मिळाला.
-
२) विराट कोहली – २०१७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहली दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. यावेळी विराटने ड्रिंक्स ब्रेक दरम्यान वॉटरबॉयची भूमिका निभावत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
-
३) डॉन ब्रॅडमन – १९२८ साली वयाच्या २० व्या वर्षीही ब्रॅडमन वॉटर बॉय म्हणून मैदानात आले होते. (फोटो सौजन्य – मोहनदास मेनन ट्विटर अकाऊंट)
-
४) रिकी पाँटींग – २०११ साली माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींग श्रीलंका अध्यक्षीय संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात वॉटरबॉय म्हणून मैदानात आला होता.
-
५) सचिन तेंडुलकर – ICC World XI vs Asia XI या सामन्यात सचिन तेंडुलकरही वॉटरबॉय बनला होता.
ब्रॅडमन ते विराट…व्हाया सरफराझ, जेव्हा महत्वाचे खेळाडू बनतात वॉटरबॉय
Web Title: From virat kohli to ms dhoni when substitute captains carried drinks for their teammates psd