-
आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईत दाखल झालेल्या मुंबई इंडियन्स संघाचा क्वारंटाइन कालावधी आता संपला असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. संघ व्यवस्थापनाने आपल्या खेळाडूंना एकत्र भेटून बोलता यावं यासाठी एका बाँडिंग सेशनचं आयोजन केलं होतं. (सर्व छायाचित्र – MI Facebook Account)
-
कर्णधार रोहित शर्मा आपल्या कॅज्युअल अवतारात सहकाऱ्यांसोबत नाचताना
-
प्रदीर्घ कालावधीनंतर सरावाला केलेली सुरुवात आणि जगभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता खेळाडूंना अशा बाँडिंग सेशनची खरंच गरज असते.
-
पांड्या बंधूंनीही माईक दिसताच आपली गाण्याची हौस भागवून घेतली.
-
प्रशिक्षक महेला जयवर्धनेही निवांत मूडमध्ये दिसत होते.
-
जसप्रीत बुमराह गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड आणि प्रशिक्षक जयवर्धने यांच्यासोबत गप्पा मारताना.
-
गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडून यंदाही चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
IPL 2020 : क्वारंटाइन कालावधी संपला, मुंबई इंडियन्सचं बाँडिंग सेशन
Web Title: Quarantine time over first ever bonding session of mumbai indians see pictures psd