इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला प्रारंभ होण्यासाठी अवघा एक आठवडा शिल्लक आहे. सर्व संघाचा दुबई कसून सराव सुरु आहे. पाचव्या जेतेपदासाठी धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईचा संघ चौथ्या जेतेपदासाठी मैदानावर उतरणार आहे… आयपीएलच्या १३ व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई आणि मुंबईच्या संघामध्ये होणार आहे. १९ सप्टेंबर रोजी आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. विश्वचषकानंतर धोनी पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर अनेक अशक्यप्राय विक्रम आहेत. तेसेच काही विक्रम आयपीएलमध्येही धोनीच्या नावावर आहे. या विक्रमाच्या जवळही एखादा खेळाडू नाही… पाहूयात धोनीचे असेच सात विक्रम.. १०० सामने जिंकणारा धोनी आयपीएलमधील एकमेव कर्णधार आहे. धोनीने चेन्नईशिवाय पुणे संघाचंही कर्णधारपद भूषावलं आहे. धोनी एकमेक कर्णधार आहे जो संघाच्या सर्व कोचचा कर्णधार राहिला आहे. चेन्नईचे मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग, गोलंदाजी कोच लक्ष्मीपती बालाजी, फलंदाजी कोच माइक हसी, हे सर्वजण धोनीच्या नेतृत्वात खेळले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक स्टपिंग करण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. धोनीने आतापर्यंत ३८ वेळा स्टपिंग केली आहे. दिनेश कार्तिक ३० स्टपिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वाधिकवेळा आयपीएलचा अंतिम सामान खेळण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. धोनी आतापर्यंत ९ वेळा अंतिम सामना खेळला आहे. यष्टीमागे सर्वाधिक बळी धोनीच्या नावावर आहेत. धोनीने आतापर्यंत ९४ झेल आणि ३८ स्टपिंग केल्या आहेत. आयपीएलमध्ये धोनीने यष्टीमागे आतापर्यंत १३२ जणांना बाद केलं आहे. आयपीएलमध्ये २० व्या षटकांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. २० षटकांत धोनीने आतापर्यंत ५६४ धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड असून त्यानं २८१ धावा काढल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे.
धोनीचे हे अशक्यप्राय विक्रम तुम्हाला माहित आहेत का?
IPL 2020
Web Title: Ipl 2020 ms dhoni 7 records chennai super kings nck