• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2020 tushar deshpande from ball boy 2008 ipl to match winner in 2020 ipl scsg

२००८ IPL मधील बॉल बॉय ते २०२० मधील मॅच विनर… कल्याणकर तुषार देशपांडेचा थक्क करणारा प्रवास

आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने गोलंदाजीची छाप पाडली

October 15, 2020 11:56 IST
Follow Us
  • श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत आश्वासक कामगिरी करत आला आहे. दुबईच्या मैदानावर दिल्लीने राजस्थान रॉयल्सवर १३ धावांनी मात केली. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. मात्र दिल्लीच्या विजयात मूळचा कल्याणचा असणाऱ्या मराठमोळ्या तुषार देशपांडेला संधी देण्यात आली.
    1/

    श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत आश्वासक कामगिरी करत आला आहे. दुबईच्या मैदानावर दिल्लीने राजस्थान रॉयल्सवर १३ धावांनी मात केली. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. मात्र दिल्लीच्या विजयात मूळचा कल्याणचा असणाऱ्या मराठमोळ्या तुषार देशपांडेला संधी देण्यात आली.

  • 2/

    राजस्थानविरुद्ध सामन्यात दिल्लीने हर्षल पटेलला विश्रांती देत मराठमोळ्या तुषार देशपांडेला संधी दिली. तुषारनेही आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत दोन महत्वाचे बळी टिपले. बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांची जोडी मैदानावर स्थिरावत असताना शिखर धवनने तुषारला गोलंदाजी सोपवली आणि तुषारने बेन स्टोक्सला जाळ्यात अडकवलं. याच तुषारच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

  • 3/

    स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या तुषार देशपांडेची कहाणीही अगदी २००८ च्या पहिल्या आयपीएलमध्ये १३ वर्षांखालील संघात खेळताना बॉल बॉयच्या भूमिकेपासून सुरु होत आज दिल्लीसाठी मॅच विनर ठरण्यापर्यंत आलीय.

  • 4/

    मुळचा कल्याणचा रहिवासी असलेला तुषार देशपांडे स्थानिक क्लबमध्ये नियमीत सरावाला जायचा. सुरुवातीपासूनच चांगला फलंदाज होण्याचं स्वप्न पाहिलेल्या तुषार देशपांडे नंतरच्या काळात गोलंदाज झाला.

  • 5/

    २००७ साली मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या १३ वर्षाखालील मुलांच्या संघाची निवड शिवाजी पार्क मैदानावर होणार होती. यावेळी ट्रायलसाठी मैदानावर आलेल्या तुषारला फलंदाजीसाठी त्याच्यासारखेच ६०-७० खेळाडू रांगेत दिसले.

  • 6/

    एमसीएच्या या संघ निवडीमध्ये एकीकडे फलंदाजांची गर्दी असतानाच दुसरीकडे गोलंदाजीच्या रांगेत कमी खेळाडू असल्यामुळे तुषारने गोलंदाजीच्या रांगेत उभं रहायचं ठरवलं.

  • 7/

    महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी गोलंदाजीसाठी आलेल्या खेळाडूंमध्ये तुषार देशपांडेने आश्वासक मारा करत निवड समितीच्या सदस्यांचं लक्ष वेधलं आणि इथूनच तुषारसाठी मुंबई संघाची दारं खुली झाली.

  • 8/

    तुषारचे आई-वडिल सरकारी कर्मचारी आहेत.

  • 9/

    दरदिवशी सरावासाठी कल्याण ते शिवाजी पार्क असा प्रवास करताना आपल्या मुलाला कसलाही त्रास होणार नाही याची तुषारच्या आई-वडिलांनी कायमच काळजी घेतली. (फोटो: Twitter/cricket_mumbai वरुन)

  • 10/

    २०१६-१७ साली तुषारने मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केलं.

  • 11/

    २०१८-१९ च्या विजय हजारे करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत तुषारने ५ बळी घेत मुंबईला एकहाती सामना जिंकवून दिला होता. (फोटो: Twitter/ABHAY_1987 वरुन साभार)

  • 12/

    तुषारने भारताचा माजी सलामीवीर आणि दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरचा घेतलेला बळी हा चर्चेचा विषय बनला होता.

  • 13/

    उत्तम वेग आणि यॉर्कर आणि चेंडू स्विंग करण्याच्या कौशल्यासाठी तुषार देशपांडे ओळखला जातो.

  • 14/

    विजय हजारे करंडक गाजवल्यानंतर अवघ्या एका वर्षात तुषार दुलिप करंडकासाठी इंडिया ब्ल्यू संघात निवडला गेला.

  • 15/

    तेराव्या हंगामासाठी दिल्लीने तुषारवर २० लाखांची बोली लावत तुषारला संघात स्थान दिलं.

  • 16/

    डेल स्टेन हा तुषारचा आदर्श आहे. नुकतीच त्याची स्टेनबरोबर भेट झाली होती.

  • 17/

    राजस्थानविरुद्धच्या सामन्यात तुषारने केलेल्या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • 18/

    अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन तुषारच्या वेगाचे कौतुक केलं आहे.

  • 19/

    तुषार पुढील सामन्यांमध्ये आणि कालांतराने भारतीय संघात दिसावा अशीच प्रत्येक क्रिकेट चाहत्याची कालच्या दिल्लीच्या सामन्यानंतरची इच्छा असेल यात वाद नाही.

  • तुषारला आता पुढील सामन्यात पाहण्याची इच्छा असल्याचे अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे. (सर्व फोटो: मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, तुषार देशपांडे स्टारस्पोर्ट्सवेब यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन साभार)

Web Title: Ipl 2020 tushar deshpande from ball boy 2008 ipl to match winner in 2020 ipl scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.