• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian cricket team captain virat kohli birthday spacial why he is called king jud

३२ वर्ष, ३२ विक्रम, ३२ फोटोंमध्ये पाहा का आहे विराट क्रिकेटचा किंग

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • जगातील सर्वोत्कृष्ठ खेळाडूंच्या यादीत आज विराट कोहलीच्या नाव घेतलं जात. ५ नोव्हेंबर रोजी विराट ३२ वर्षांचा झाला. सध्या तो आयपीएल सामन्यांसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहे. आज आपण जाणून घेणार आहोत का विराटला क्रिकेटचा किंग असं म्हटलं जातं. २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अंडर १९ टीमनं वर्ल्डकप जिंकला होता.
    1/32

    जगातील सर्वोत्कृष्ठ खेळाडूंच्या यादीत आज विराट कोहलीच्या नाव घेतलं जात. ५ नोव्हेंबर रोजी विराट ३२ वर्षांचा झाला. सध्या तो आयपीएल सामन्यांसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहे. आज आपण जाणून घेणार आहोत का विराटला क्रिकेटचा किंग असं म्हटलं जातं. २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अंडर १९ टीमनं वर्ल्डकप जिंकला होता.

  • 2/32

    विराट कोहली देवधर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नेतृत्व करणारा दुसरा सर्वात युवा खेळाडू आहे. २००९-१० मध्ये अंतिम सामन्यात जेव्हा त्यानं संघाचं नेतृत्व केलं होतं त्यावेळी त्याचं वय २१ वर्ष आणि १२४ दिवस होतं. गेल्या वर्षी शुभमन गिलनं (२० वर्ष आणि ५७ दिवस) विराटचा विक्रम तोडला होता.

  • 3/32

    विराट एका दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यादरम्यान विराटनं हा विक्रम केला होता. वेस्ट इंडिजविरोधातील तिसऱ्या सामन्यात ९९ चेंडूंत ११४ धावा करत त्यानं हा विक्रम केला.

  • 4/32

    सर्वात जलद १० हजार धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटचं नाव आहे. २०८ मध्ये त्यानं हा विक्रम केला. वेस्ट इंडिजविरोधात त्यानं नाबाद १५७ करत हा विक्रम केला. २०५ डावांमध्ये त्यानं १० हजार धावा केल्या. सचिन तेंडुलकरनं २५९ डावांमध्ये १० हजार धावा केल्या होत्या.

  • 5/32

    एका कॅलेंडर इयरमध्ये सर्वात जलद गतीनं १ हजार धावा करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. त्यानं ११ डावांमध्ये १ हजार धावांचा पल्ला गाठला. यापूर्वी १५ डावांमध्ये १ हजार धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम हाशिम आमलाच्या नावावर होता.

  • 6/32

    एका वर्षात आयसीसीचे सर्व वार्षिक व्यक्तीगत पुरस्कार मिळवणारा विराट हा एकमेव क्रिकेटपटू आहे. २०१८ मध्ये उत्तम खेळानंतर त्याला सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी, आयसीसी टेस्ट आणि वन डे प्लेअर ऑफ द इयर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

  • 7/32

    भारतीय कर्णधार विराट कोहली हा दोन संघांच्याविरोधात सलग तीन शतक ठोकणारा पहिला खेळाडू आहे. कोहलीनं फेब्रुवारी २०१२ ते जुलै २०१२ या कालावधीत श्रीलंकेच्या विरोधात १३३, १०८ आणि १०६ धावा केल्या होत्या. तर २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरोधात १४०, १५७ आणि १०७ धावा केल्या होत्या.

  • 8/32

    कोहलीनं एक कर्णधार म्हणून एका कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. २०१७ मध्ये त्यानं २६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४६० धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर होता. त्यानं १४२४ धावा केल्या होत्या.

  • 9/32

    २०१९ च्या विश्वचषक स्पर्धतेून संघ बाहेर गेला असला तरी यात सलग पाच अर्धशतक ठोकणारा विराट पहिला कर्णधार होता.

  • 10/32

    विराट कोहली हा पहिला असा कसोटी सामन्यातील कर्णधार ठरला आहे ज्यानं तीन कॅलेंडर वर्षात सलग १ हजार धावा केल्या. त्यानं २०१६ मध्ये १२१५, २०१७ मध्ये १०५९ आणि २०१८ मध्ये १३२२ धावा केल्या होत्या.

  • 11/32

    विराट कोहलीनं कसोटी कर्णधाराच्या भूमिकेत सर्वाधिक सात द्विशतकं ठोकली आहेत. त्याच्याव्यतिरिक्त ब्रायन लारानं ५, सर डॉन ब्रॅडमन, मायकल क्लार्क आणि स्मिथ यांनी ४ द्विशतकं ठोकली.

  • 12/32

    आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. त्यानं २०१६ मध्ये सर्वाधित ९७३ धावा केल्या होत्या.

  • 13/32

    कर्णधारपद सांभाळताना एकदिवसीय सामन्यांत सर्वात जलद ३ हजार धावा करण्याचा विक्रमही विराटच्या नाववार आहे. हा विक्रम त्यानं ४९ डावांमध्ये केला होता.

  • 14/32

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटनं एका कॅलेंडर वर्षात ११ शतकं ठोकली आहेत. केवळ सचिन तेंडुलकनं त्याच्यापेक्षा अधिक म्हणजे १२ शतकं ठोकली होती.

  • 15/32

    एक कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटच्या नावे आहे. त्यानं दौऱ्यादरम्यान १२५ चेंडूंमध्ये १२० धावा केल्या होत्या.

  • 16/32

    २०१८ मध्ये सर्वात जलद ४ हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रमही विराटच्या नावे आहे. त्यानं ६५ डावांत हा विक्रम केला. यापूर्वी ७१ डावांमध्ये हा पल्ला गाठण्याचा विक्रम ब्रायन लाराच्या नावे होता.

  • 17/32

    एकदिवसीय सामन्यांमध्ये ३० आणि ३५ शतकं जलद करण्याचा विक्रमही विराटच्या नावे आहे.

  • 18/32

    आंतरराष्ट्रीय टी-२० सामम्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटच्या नावे आहे. त्यानं ब्रेंडन मॅक्क्युलमला मागे टाकलं.

  • 19/32

    कोहली एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग तीन शतकं ठोकणारा पहिला कर्णधार आहे.

  • 20/32

    ३५० आणि त्यापेक्षा अधिक धावांचा पाठलाग करतानाही विराटचा उत्तम विक्रम आहे. आतापर्यंत त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं ३५० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना तीन वेळा यश मिळवलं. तिन्ही वेळा विराटनं सामन्यात शतक ठोकलं होतं.

  • 21/32

    कोहलीनं २०११ मध्ये टी२० सामन्यात इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला बाद केलं होतं. चेंडू लेग साईडला वाईड गेला होता. त्यावेळी धोनीच्या स्टंपिंगमुळे पीटरसन क्रिजपर्यंत पोहोचू शकला नव्हता.

  • 22/32

    कोहलीनं २०११ मध्ये विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केलं. त्यानं बांगलादेशविरोधातील सामन्यात शतक ठोकलं होतं. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय ठरला होता.

  • 23/32

    विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरोधातही शतक ठोकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. २०१५ मध्ये त्यानं १२६ चेंडूंमध्ये १०७ धावा केल्या होत्या.

  • 24/32

    दोन संघांच्या एकदिवसीय सीरिजमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा सामनाही विराटच्या नावे आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात ६ सामन्यांमध्ये ५५८ धावा केल्या होत्या.

  • 25/32

    दोन संघांच्या एकदिवसीय सीरिजमध्ये ५०० धावा करणाराही विराट पहिला फलंदाज आहे

  • 26/32

    आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधित शतक ठोकण्याचा विक्रमही विराटच्या नावे आहे. २०१६ मध्ये आरसीबीकडून त्यानं चार शतकं ठोकली होती.

  • 27/32

    दक्षिण आफ्रिकेविरोधात गेल्यावर्षी कसोटी सामन्यांदरम्यान विराट हा सर्वाधिक फॉलो ऑन देणारा कर्णधार ठरला. त्यानं भारतीय कर्णधाराच्या रूपात ८ वेळा फॉलो ऑन दिले आहेत. यापूर्वी महम्मद अझरुद्दीननं ७ वेळा समोरच्या संघांना फॉलो ऑन दिले होते.

  • 28/32

    दक्षिण आफ्रिकेविरोधात गेल्यावर्षी कसोटी सामन्यांदरम्यान विराट हा सर्वाधिक फॉलो ऑन देणारा कर्णधार ठरला. त्यानं भारतीय कर्णधाराच्या रूपात ८ वेळा फॉलो ऑन दिले आहेत. यापूर्वी महम्मद अझरुद्दीननं ७ वेळा समोरच्या संघांना फॉलो ऑन दिले होते.

  • 29/32

    कर्णधार म्हणून विराटनं कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा १५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यानं ९ वेळा १५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी सर डॉन ब्रॅडमन यांनी आठ वेळा कसोटी सामन्यात १५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.

  • 30/32

    कसोटी सामन्यात द्विशतकांच्या बाबतीतही विराटनं वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांना मागे टाकलं आहे. त्यानं ८६ सामन्यांमध्ये ७ द्विशतकं ठोकली आहेत.

  • 31/32

    एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ८ हजार, ९ हजार, १० हजार आणि ११ हजार धावा करण्याचा विक्रमही विराटच्या नावे आहे.

  • 32/32

    कसोटी सामन्यांच्या इतिहासात सलग चार सीरिजमध्ये चार द्विशतकं ठोकणारा विराट हा एकमेव फलंदाज आहे.

Web Title: Indian cricket team captain virat kohli birthday spacial why he is called king jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.