-
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामामध्ये सूर्यकुमार यादवच्या कामगिरीची चर्चा पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघातील या स्फोटक फलंदाजाने आयपीएलच्या १३ व्या सीझनमध्ये आतापर्यंत १५ सामान्यांमध्ये ४१. ९० च्या सरासरीने १४८.२३ धावगतीने ४६१ धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचाही समावेश आहे. (सर्व फोटो : Twitter/surya_14kumar आणि Twitter/mipaltan तसेच BCCI/IPL वरुन साभार)
-
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सदरम्यान दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या प्लेऑफच्या पहिल्याच सामन्यात सूर्यकुमार यादवने ३८ चेंडूंमध्ये ५१ धावांची खेळी केली. या ५१ धावांच्या खेळीच्या जोरावर सूर्यकुमारने अनेक विक्रम आपल्या नावे करुन घेतलेत.
-
सूर्यकुमारने आपल्या या ५१ धावांच्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. याच ५१ धावांमुळे सूर्यकुमारने आयपीएलमध्ये १०० सामन्यांमध्ये २००९ धावा पूर्ण केल्या आहेत.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न करताना आयपीएलमध्ये दोन हजारहून अधिक धावा करणारा सूर्यकुमार हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
-
त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधीच शंभर आयपीएल सामने खेळणारा सूर्यकुमार हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. सुर्यकुमार २०१३ पासून आयपीएल खेळत आहे.
-
२०१३ पासून आतापर्यंत सूर्यकुमारने ३०.४३ च्या सरासरीसहीत १३५.३७ च्या धावगतीने दोन हजारहून अधिक धावा केल्या आहेत.
-
सूर्यकुमार यादवच्या नावे आतापर्यंत ११ अर्धशतकांची नोंद आहे. त्यापैकी चार अर्धशतके तर त्याने याच वर्षी केली आहेत.
-
स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईच्या संघामध्ये कामगिरीच्या जोरावर सूर्यकुमारने आपली वेगळी छाप सोडली आहे. त्याने २०१८ च्या आयपीएलमध्ये १४ सामान्यांत ५१२ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याचा स्ट्राइक रेट १३३ हून अधिक होता.
-
मागील हंगामामध्ये म्हणजेच २०१९ मध्ये आयपीएलच्या १२ व्या पर्वात सूर्यकुमार १६ सामाने खेळला. या १६ सामान्यांमध्ये त्याने ४२४ धावा केल्या होत्या.
-
आयपीएलबरोबरच सूर्यकुमार यादवने घरगुती क्रिकेटमध्येही बऱ्याच धावा केल्या आहेत. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपली निवड होईल अशी अपेक्षा सूर्यकुमारला होता. मात्र त्याची या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सूर्यकुमारबरोबरच त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्य वाटले आहे. मात्र प्लेऑफमधील पहिल्याच सामन्यात पुन्हा एकदा दणक्यात अर्धशतक ठोकून सूर्यकुमारने निवड समितीच्या सदस्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
IPL 2020: मुंबईची रनमशीन… एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळता सूर्यकुमारने केला हा पराक्रम
३८ चेंडूंमध्ये ५१ धावांची खेळी करत नावावर केले अनोखे विक्रम
Web Title: Ipl 2020 mi vs dc suryakumar yadav first uncapped player to 2000 ipl runs scsg