-
साक्षी धोनीचा आज वाढदिवस आहे. १९ नोव्हेंबर १९८८ रोजी उत्तराखंडमध्ये साक्षीचा जन्म झाला. भारताच्या क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची ती पत्नी आहे. धोनीच्या बरोबरीने साक्षी सुद्धा नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य – साक्षी धोनी इन्स्टाग्राम)
-
आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने कॅमेऱ्याने लक्ष नेहमीच साक्षीकडे असते. प्रेक्षक गॅलरीतून ती नेहमीच नवऱ्याला अर्थात एम.एस.धोनीला पाठिंबा देताना दिसते.
-
फार कमी जणांना माहित असेल, साक्षीने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. साक्षी आणि धोनी दोघे परस्परांना लहानपणापासून ओळखत होते. पण त्यावेळी ते प्रेमात पडले नाहीत.
-
योग्य वयात आल्यानंतरच त्यांचा प्रेमाचा सूर जुळला. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार धोनी आणि साक्षीचे वडिल एकाच कंपनीत नोकरीला होते.
-
काही वर्ष डेटिंग केल्यानंतर साक्षी आणि एमएस धोनी चार जुलै २०१० रोजी विवाहबद्ध झाले.
-
लग्नानंतर पाच वर्षांनी सहा फेब्रुवारी २०१५ रोजी साक्षीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. धोनी आणि साक्षी दोघे आई-बाबा बनले. झिवा असे त्यांच्या मुलीचे नाव आहे.
-
धोनी आणि साक्षी परस्परांच्या संपर्कात नव्हते. पण २००७ साली कोलकात्ताच्या ताज बेंगाल हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमात नाते फुलत गेले. औरंगाबादमधून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतल्यानंतर साक्षी कोलकात्त्यातील हॉटेलमध्ये इंटर्नशिप करत होती.
-
साक्षी सोशल मीडियावर सुद्धा नेहमीच चर्चेत असते. माध्यमांध्ये धोनीच्या बरोबरीने साक्षीचीही चर्चा होते.
-
"दहा वर्ष एकत्र चालणे हे टीमवर्क आहे. प्रगतीसाठी आम्ही दोघांनी एकमेकांना मोकळीक दिली त्यातून आम्ही अधिक परिपक्व झालो. त्यावेळी आम्हाला दोघांना परस्परांची प्रचंड ओढ होती. म्हणून अधिक जवळ आलो. चांगल्या-वाईट काळात परस्परांना साथ देत राहिलो, त्यामुळे आम्हाला प्रेमाची जादू कळली" असे साक्षीने म्हटले होते.
-
लग्न झाल्यापासूनच साक्षीने धोनीला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवासात खंबीर साथ दिली.
एम.एस.धोनीची बायको साक्षीचा घायाळ करणारा लूक
Web Title: Stunning and stylish sakshi dhoni wife of ms dhoni dmp