करोना लशीसंदर्भातील एका ट्विटमुळे भारताचा माजी फिरकीपटू ट्रोल होत आहे. करोनाची लस निघाल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. लवकरच करोना विरोधात लढण्यासाठी आपल्याकडे लस उपलब्ध होणार असल्यामुळे जगभारतील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. फायजर लस ९५ टक्के असरदार असल्याचे समोर आलं आहे. अशा परिस्थितीच हरभजन सिंग यानं केलेल्या ट्विटमुळे नेटकरी संतापले आहेत. भज्जीचं ट्विट – फाइजर आणि बायोटेक लस ९४ टक्के प्रभावशाली आहे. मोडेर्ना लस – 94.5 टक्के तर ऑक्सफर्ड लस- 90 टक्के प्रभावशाली आहे. भारतातील बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी (लशीशिवाय) ९३.६ टक्के आहे. खरेच आपल्याया करोना लशीची गरज आहे का? भज्जीच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी मिम्सच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. पाहूयात काय म्हणतात नेटकरी…. -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
करोना लशीसंदर्भात भज्जीचं ट्विट; मिम्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Web Title: Harbhajan singh trolled brutally for asking whether indians seriously need covid 19 vaccine nck