• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. 5 uncapped players who have earned the most money from ipl psd

भारतीय संघात वेटिंग लिस्टवर पण IPL मधून कोट्यवधीची कमाई

Updated: September 9, 2021 00:44 IST
Follow Us
  • आयपीएलचा तेरावा हंगाम नुकताच युएईत पार पडला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्या हंगामात या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. (फोटो सौजन्य - IPL)
    1/10

    आयपीएलचा तेरावा हंगाम नुकताच युएईत पार पडला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्या हंगामात या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. (फोटो सौजन्य – IPL)

  • 2/10

    मुंबई इंडियन्सचं आतापर्यंतच्या या स्पर्धेच्या इतिहासातलं हे पाचवं विजेतेपद ठरलं.

  • 3/10

    आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टीम इंडियात जागा मिळावी अशी अनेक चाहत्यांची इच्छा असते.

  • 4/10

    तेराव्या हंगामाच्या अखेरीस काही खेळाडूंना चांगली कामगिरी करुनही भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे मोठा वाद रंगला.

  • 5/10

    IPL मध्ये चांगली कामगिरी करणारे आणि टीम इंडियासाठी वेटींग लिस्टवर असणारे अनेक खेळाडू सध्या शर्यतीत आहे. पण भारतीय संघात स्थान मिळालं नसलं तरीही हे खेळाडू आयपीएलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावत आहेत. आजआपण अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत…

  • 6/10

    ५) सूर्यकुमार यादव – (आतापर्यंत अंदाजे १२.७ कोटींची कमाई) २०११ साली मुंबई इंडियन्सकडून आयपीएल हंगामाची सुरुवात करणाऱ्या सूर्यकुमारवर मुंबईने १० लाखांची बोली लावली होती. यानंतर २०१४ साली KKR ने सूर्यकुमारसारठी ७० लाख प्रतिहंगाम मोजत त्याला आपल्या संघात घेतलं. यानंतर ३ वर्षांनी आपल्या बहारदार कामगिरीच्या जोरावर सूर्यकुमार पुन्हा एकदा मुंबई संघात आला, ज्यासाठी मुंबई इंडियन्सने त्याच्यावर ३.२ कोटींची बोली लावली.

  • 7/10

    ४) दीपक हुडा (आतापर्यंत अंदाजे १६.९ कोटींची कमाई) २०१४ साली राजस्थान रॉयल्स संघाकडून केलेल्या बहारदार खेळामुळे दीपक हुडा पहिल्यांदा चर्चेत आला. राजस्थानने त्याच्यावर ४० लाखांची बोली लावली होती. २०१६ साली झालेल्या लिलावात सनराईजर्स हैदराबादने दीपक हुडावर थेट ४.२ कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. मात्र कालांतराने त्याच्या कामगिरीत घसरण होत केली. २०२० हंगामासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबने दीपक हुडासाठी ५० लाख मोजत त्याला आपल्या संघात घेतलं.

  • 8/10

    ३) इशान किशन (आतापर्यंत अंदाजे १९.३ कोटींची कमाई) – U-19 क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर २०१६ साली गुजरातच्या संघाने पहिल्यांदा इशान किशनवर बोली लावली. यासाठी त्याला प्रतिहंगाम ३५ लाख रुपये मिळायचे. दोन वर्षांनी गुजरातचा संघ बाहेर गेल्यानंतर किशन पुन्हा लिलावाच्या यादीत आला. यावेळी मुंबईने त्याच्यावर ६.२ कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं.

  • 9/10

    २) मनन व्होरा (आतापर्यंत अंदाजे १९.८ कोटींची कमाई) – २०१३ पासून आयपीएलमध्ये खेळत असूनही मनन व्होरा भारतीय संघात आपलं स्थान मिळवू शकला नाही. आतापर्यंत मननने पंजाब, राजस्थान आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. २०१४ ते २०१७ या तीन हंगामाकरत पंजाबने मनन व्होरावर ४ कोटींची बोली लावली होती. परंतू कालांतराने कामगिरीत घसरण झाल्याने त्याचं मूल्यही कमी झालं. सध्या त्याचं प्रतिहंगाम मानधन २० लाख आहे. (फोटो सौजन्य – पीटीआय)

  • 10/10

    १) कृष्णप्पा गौतम – (आतापर्यंत अंदाजे २०.६ कोटींची कमाई) – २०१७ साली कृष्णप्पा गौतमवर पहिल्यांदा बोली लावण्यात आली. मुंबईने त्याच्यासाठी २ कोटी रुपये खर्च केले. २०१८ च्या हंगामापर्यंत त्याचं मानधन हे ६.२ कोटींवर पोहचल होतं. यानंतर राजस्थानच्या संघाने याच किमतीत त्याला पंजाबच्या संघाकडे दिलं.

Web Title: 5 uncapped players who have earned the most money from ipl psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.