• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. vijay hazare trophy samarth padikkal inflict rampage as karnataka maul kerala to reach semis scsg

Vijay Hazare Trophy: राहुल द्रविडच्या शिष्याने ठोकल्या १९२ धावा; चौकार, षटकारांचा पाडला पाऊस

अवघ्या २५ चेंडूत त्याने १०६ धावा केल्या

Updated: September 9, 2021 00:33 IST
Follow Us
  • विजय हजारे चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये कर्नाटकच्या फलंदाजांनी केरळच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्नाटकने ५० षटकांमध्ये तीन गड्यांच्या मोबदल्यात ३३८ धावा केल्या. कर्नाटकसाठी देवदत पडीक्कलने ११९ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्या.
    1/12

    विजय हजारे चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये कर्नाटकच्या फलंदाजांनी केरळच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्नाटकने ५० षटकांमध्ये तीन गड्यांच्या मोबदल्यात ३३८ धावा केल्या. कर्नाटकसाठी देवदत पडीक्कलने ११९ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्या.

  • 2/12

    मात्र देवदतसोबत सलामीवीर म्हणून फलंदाजीस उतरलेला कर्नाटकचा कर्णधार रविकुमार समर्थने तब्बल १९२ धावा ठोकल्या. 

  • 3/12

    समर्थने आपल्या वादळी खेळीमध्ये २२ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १९२ धावांचा टप्पा गाठला. म्हणजेच अवघ्या २५ चेंडूत समर्थने १०६ धावा केल्या.

  • 4/12

    समर्थचा स्ट्राइक रेट हा १२१.५२ इतका होता. समर्थने पडीक्कलच्या मदतीने पहिल्या विकेटसाठी २४९ धावांची भागीदारी केली.

  • 5/12

    समर्थला अरामात द्विशतक झळकावता आले असते मात्र ४९ व्या षटकामध्ये एन.पी. बासिलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.

  • 6/12

    समर्थ १९२ धावांवर बाद झाला. ही त्याची ए लिस्टेट क्रिकेटमध्ये सर्वोत्तम धावसंख्या आहे. 

  • 7/12

    समर्थ हा राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या खेळाडूंपैकी एक आहे. राहुल द्रविड जेव्हा भारत अ संघाचा प्रशिक्षक होता तेव्हा समर्थ त्या संघाचा भाग होता.

  • 8/12

    समर्थने भारत अ संघासाठी इंग्लंड दौऱ्यामध्ये १३७ धावांची खेळी केली होती. न्यूझीलंड अ संघाविरोधात खेळण्यासाठी गेलेल्या भारताच्या अ संघातून खेळताने समर्थने ५० धावांची खेळी करुन सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं होतं.  

  • 9/12

    विजय हजारे स्पर्धेमध्येही समर्थने आत्तापर्यंत ६०० हून अधिक धावा केल्या आहेत.

  • 10/12

    समर्थने विजय हजारे स्पर्धेत आतापर्यंत तीन शतक आणि दोन अर्धशतकं ठोकली आहेत.

  • 11/12

    समर्थच्या फलंदाजीची सरासरी १५० हूनही अधिक आहे. 

  • 12/12

    विशेष म्हणजेच विजय हजार चषक स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाज होण्याच्या शर्यतीमध्ये समर्थसोबत संघ सहकारी पड्डीकलचेच नाव चर्चेत आहे. पड्डीकलने चार शतकांच्या मदतीने आतापर्यंत ६७३ धावा केल्या आहेत. कर्नाटकने दिलेलं हे आव्हान केरळला पेलवलं नाही. केरळचा संघ २५८ धावांमध्ये तंबूत परतला. (सर्व फोटो ट्विटर आणि स्क्रीनशॉर्टवरुन साभार)

Web Title: Vijay hazare trophy samarth padikkal inflict rampage as karnataka maul kerala to reach semis scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.