• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. pune sudhir kumar chaudhary watch india vs england first odi from hill top scsg

Photos: क्रिकेटवेडाच… Ind vs Eng सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश नसल्याने त्याने काय केलं पाहा

सध्या सोशल नेटवर्किंगवर त्याचे फोटो चर्चेचा विषय ठरतायत

Updated: September 9, 2021 00:31 IST
Follow Us
  • राज्यामधील करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याने पुण्यामध्ये खेळवण्यात येत असणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यानच्या एकदिवसीय सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली नाही.
    1/20

    राज्यामधील करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याने पुण्यामध्ये खेळवण्यात येत असणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यानच्या एकदिवसीय सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली नाही.

  • 2/20

    भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यानचे पुण्यातील तीनही सामने रिकाम्या स्टेडियमवर होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

  • 3/20

    मात्र क्रिकेटचा सामना सोडतील ते भारतीय कसले असं म्हणतात त्याचप्रमाणे काहीजण अगदी हौसेने या पुण्यातील गहुंजे स्टेडियमच्या आजूबाजूला असणाऱ्या इमारतींच्या गच्चींवरुन पाहतानाचे चित्र दित आहे.

  • 4/20

    भारतीय क्रिकेट चाहत्यांपैकी सर्वात लोकप्रिय चेहरा असणाऱ्या सुधीर कुमार चौधरीने या करोनामुळे आलेल्या निर्बंधांवर अनोखा उपाय शोधला आहे.

  • 5/20

    पुण्यातील गहुंजे स्टेडियमच्या जवळच असणाऱ्या एका टेकडीवरुन सुधीर कुमार चौधरीने पहिल्या एकदिवसीय सामन्याचा आनंद घेतला.

  • 6/20

    सुधीरनेच यासंदर्भातील काही फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केलेत.

  • 7/20

    महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडदरम्यान एकदिवसीय मालिकेचे सामने सुरू असून पहिल्या सामन्याला सुधीर कुमार चौधरीने कशापद्धतीने हजेरी लावली याबद्दलचे फोटो पोस्ट केलेत.

  • 8/20

    या मैदानापासून अंदाजे अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या वाघजाई मंदिराच्या टेकडीवरुन सुधीर कुमार चौधरीने पहिला सामना पाहिला.

  • 9/20

    मैदानात प्रवेश नसल्याने सुधीर कुमार चौधरी थेट या वाघजाईच्या टेकडीवरुन भारतीय संघाला चेअरअप करत होता.

  • 10/20

    मुळचा बिहारचा असलेला सुधीर कुमार चौधरी हा अंगावर तिरंगा रंगवून भारताचा माजी क्रिकेटपटू असणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या सर्व सामन्यांसाठी उपस्थित राहणारा चाहता म्हणून नावारुपास आला.

  • 11/20

    भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी सुधीर कुमार चौधरी हा आपल्या शरीरावर तिरंगा रंगवून घेतो. पाठीवर आणि पोटावर तेंडुलकर असं लिहून तो सामन्यांना हजेरी लावतो.

  • 12/20

    सुधीर कुमार चौधरी अंगावर तिरंगा रंगवून एका हातात झेंडा आणि दुसऱ्या हातात शंख घेऊन सामना पाहण्यासाठी हजर असतो.

  • 13/20

    सचिन निवृत्त झाल्यानंतरही सुधीर कुमार चौधरी भारतीय संघांचे सामने असतील तिथं आवर्जून उपस्थित राहतो. आता फक्त अंगावरील सचिन तेंडुकलरच्या आधी मीस यू असंही तो लिहून घेतो.

  • 14/20

    पुण्यातील तिनही सामने दिवसरात्र खेळवण्यात येत असल्याने पहिल्या सामन्यामध्ये संध्याकाळच्या वेळी वाघजाईच्या टेकडीवरुन मैदान असं दिसत होतं.

  • 15/20

    अर्धा किलोमीटर दूरुन सामना पाहतानाही सुधीर कुमार चौधरीचा उत्साह अजिबात कमी झाला नव्हता.

  • 16/20

    मैदानात वाजवतो त्याप्रमाणे अनेकदा शंख वाजवून सुधीर कुमार चौधरीने आनंद साजरा केला.

  • 17/20

    सुधीरसोबत इतरही काही चाहते वाघजाईच्या टेकडीवरुन सामना पाहण्यासाठी पोहचले होते.

  • 18/20

    सुधीरने पोस्ट केलेले हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

  • 19/20

    अनेकांनी सुधीरच्या या क्रिकेटवेडाचं कौतुक केलं आहे.

  • 20/20

    भारताने मालिकेमधील पहिला सामना जिंकला असून २५ व २८ मार्च रोजी पुढील दोन सामने याच मैदानावर प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळवण्यात येणार आहेत.

Web Title: Pune sudhir kumar chaudhary watch india vs england first odi from hill top scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.