आगामी इंग्लंड दौर्यावर भारतीय महिला क्रिकेट संघ १६ जूनपासून इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भाग घेईल. बऱ्याच काळानंतर भारतीय महिला संघ एक कसोटी सामना खेळेल. बीसीसीआयने या सामन्यासाठी संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. टीम इंडियाच्या नव्या जर्सीच्या अनावरण समारंभास झुलन गोस्वामी, मिताली राज, स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्यासह सर्व प्रमुख खेळाडू उपस्थित होते. या सर्व दिग्गज खेळाडूंनी त्यांची नवीन कसोटी जर्सी सर्वांसमोर आणली. भारतीय क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर अकाउंटवर या सर्व महिला खेळाडूंचे जर्सीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. भारतीय महिला संघ २०१४ नंतर आपला पहिला कसोटी सामना खेळेल. २०१४मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात भाग घेतला होता. या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि ३४ धावांनी विजय मिळवला. भारतीय महिला संघाने २०१४मध्येच इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामना खेळला होता. या सामन्यातही भारताने ६ गडी राखून विजय मिळवला होता. भारतीय महिला संघाने २०१४मध्येच इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामना खेळला होता. या सामन्यातही भारताने ६ गडी राखून विजय मिळवला होता.
PHOTOS : टीम इंडियाच्या नव्या कसोटी जर्सीचं झालं अनावरण
Web Title: Indian womens teams new test jersey launched adn