• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricketer ajinkya rahane turns 33 today adn

HBD JINKS : ‘बर्फा’सारखं शांत राहून टीम इंडियाचं नेतृत्व करणारा मराठमोळा क्रिकेटपटू

June 6, 2021 14:03 IST
Follow Us
    • cricketer ajinkya rahane turns 33 today
      टीम इंडियाचा नियमित कसोटी फलंदाज अजिंक्य रहाणे आज आपला ३३वा वाढदिवस साजरा करत आहे. अजिंक्य रहाणेला एकेकाळी राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हटले गेले होते. रहाणे हा एक कलात्मक शैलीचा फलंदाज असून तो भारतापेक्षा विदेशात अधिक यशस्वी ठरला आहे.
    • दहा वर्षांपूर्वी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे. कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या मुंबईकर आणि मराठमोळ्या क्रिकेटपटूची जबरदस्त कामगिरी राहिली आहे.
    • २०११ मध्ये अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याच काळात द्रविड आणि लक्ष्मणने निवृत्ती घेतली. २०१३मध्ये कसोटी पदार्पण केलेल्या रहाणेने ७३ कसोटीत ४५८३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या खात्यात १२ शतकांचा समावेश आहे.
    • भारतापेक्षा परदेशी खेळपट्ट्यांवर रहाणे यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे रहाणेने परदेशी भूमीवर १२ पैकी ८ शतके केली आहेत. रहाणेने आतापर्यंत पाच कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळले आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने चार कसोटी सामने जिंकले आहेत तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. गेल्या वर्षी रहाणेच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत २-१ असा पराभव केला होता.
    • 1/5

      अजिंक्य रहाणे

Web Title: Cricketer ajinkya rahane turns 33 today adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.