यूरो कप २०२० स्पर्धेत हंगेरीविरुद्धच्या सामन्यात पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मोठा विक्रम केला. त्याने या सामन्यात दोन गोल नोंदवत यूरो स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू म्हणून बहुमान मिळवला. यूरो कपमध्ये रोनाल्डोच्या नावावर ११ गोलची नोंद झाली आहे. (फोटो सौजन्य : यूरो कप २०२० / ट्विटर) मिचेल प्लातिनी (फ्रान्स)- फ्रान्सच्या मिचेल प्लातिनी यांनी १९८४ साली झालेल्या यूरो चषकात कमाल केली होती. पाच सामन्यात ९ गोल झळकावले होते. या कामगिरीसह फ्रान्सला पहिल्यांदा विजेतेपद मिळवून दिलं होतं. (फोटो सौजन्य : Reuters) अॅलन शेरर (इंग्लंड)- इंग्लंडच्या अॅलन शेररच्या नावावर एकूण ७ गोल आहेत. त्याने १९९२, १९९६ आणि २००० सालच्या स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. एकूण ९ सामन्यात त्यांनी ७ गोल जमा केले आहेत. अँटोनी ग्रिझमॅन (फ्रान्स)- फ्रान्सच्या अँटोनी ग्रिझमॅन याच्या नावावर एकूण ६ गोल आहेत. २०१६ च्या स्पर्धेत त्याने ही किमया साधली. ७ सामन्यांमध्ये त्यांने ६ गोल आपल्या खात्यात जमा केले. (फोटो सौजन्य : अँटोनी ग्रिझमॅन / ट्विटर) रूड वॅन निस्टलरूय (नेदरलँड)- रूड वॅन निस्टलरूयच्या नावावरही एकूण ६ गोल जमा आहेत. त्याने २००४ आणि २००८ या स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. एकूण ८ सामन्यात त्यांने ६ गोल झळकावले आहेत. (फोटो सौजन्य : रूड वॅन निस्टलरूय / ट्विटर) पॅट्रीक क्लुवर्ट (नेदरलँड)- नेदरलँडच्या पॅट्रीक क्लुवर्टच्या नावावर ६ गोलची नोंद आहे. त्याने ९ सामन्यात ही किमया साधली आहे. १९९६ आणि २००० सालच्या यूरो चषकात त्याने ही कामगिरी केली. (फोटो सौजन्य : पॅट्रीक क्लुवर्ट / ट्विटर) वॅयन रुनी (इंग्लंड)- इंग्लंडच्या वॅयन रुनी यांच्या खात्यातही ६ गोल जमा आहेत. एकूण १० सामन्यात त्याने ६ गोल झळकावले आहेत. २००४, २०१२ आणि २०१६ या स्पर्धेत त्याने हे किमया साध्य केली आहे. (फोटो सौजन्य : वॅयन रुनी / ट्विटर) थिअरी हेनरी (फ्रान्स) – फ्रान्सच्या थिअरी हेनरी यांनी यूरो कप स्पर्धेत एकूण ६ गोलची नोंद केली आहे. २०००, २००४ आणि २००८ या स्पर्धेत त्यांनी गोल झळकावले. एकूण ११ सामन्यात त्याने हे गोल केले. फ्रान्सला यूरो कप मिळवून देण्यात थिअरी हेनरी यांचा मोलाचा वाटा होता. (फोटो सौजन्य : Reuters) झाल्टन इब्राहिमोविच (स्वीडन) – झाल्टन आतापर्यंत चार यूरो चषकात खेळला आहे. त्याने १३ सामन्यात ६ गोल आपल्या नावावर केले आहेत. (फोटो सौजन्य : झाल्टन इब्राहिमोविच / ट्विटर) न्यूनो गोमेज (पोर्तुगल) – न्यूनो गोमेजनं तीन यूरो चषकात पोर्तुगलचं नेतृत्व केलं. २०००, २००४ आणि २००८ यूरो चषक स्पर्धेत न्यूनो खेळला. त्याने एकूण १४ सामन्यात ६ गोल आपल्या नावावर केले. (फोटो सौजन्य : न्यूनो गोमेज / ट्विटर)
Euro Cup मध्ये रोनाल्डो ठरला सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू, त्याच्या मागे आहेत ‘हे’ खेळाडू
Web Title: Cristiano ronaldo becomes all time euro cup top scorer adn