-
पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटून ख्रिस्तियाने रोनाल्डोने हंगेरीविरोधान २ गोल केले. या २ गोलसह त्याने सहा विक्रम मोडीत काढले आहेत.
-
-
यूरो कप २०२० स्पर्धेतील हंगेरीविरुध्दच्या सामन्यात त्याने एकूण २ गोल केले आहेत.
-
यूरो कपमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही रोनाल्डोच्या नावावर आहे. त्याने फ्रांसचा माजी फुटबॉलपटू मायकल प्लातिनी याचा विक्रम मोडीत काढला आहे. ५ यूरो कपमधील एकूण २२ सामन्यात त्याने ११ गोल केले आहेत.
-
यूरो कपमध्ये रोनाल्डोचं वय सर्वात अधिक असूनही एका सामन्यात २ आणि त्याहून अधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.
-
हंगेरीविरोधात २ गोल झळकावले तेव्हा त्याचं वय ३६ वर्षे १३० दिवस इतकं होतं. यापूर्वी हा विक्रम यूक्रेनच्या आंद्रे श्वेचेंकोच्या नावावर होता.
-
फिफा विश्वचषक आणि यूरो कप या दोन प्रतिष्ठित स्पर्धेत रोनाल्डो एकूण ३९ सामने खेळला आहे. त्यामुळे सर्वात जास्त सामने खेळणारा यूरोपियन खेळाडू असा मान त्याला मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम जर्मनीच्या बास्टियन श्वनस्टीगर याच्या नावावर होता. त्याने जर्मनीकडून ३८ सामने खेळले आहेत.
-
रोनाल्डो खेळत असलेला पाचवा यूरो कप आहे. आतापर्यंत १७ खेळाडूंनी ४ वेळा यूरो कप खेळला आहे. मात्र ५ यूरो कप खेळणारा रोनाल्डो एकमेव खेळाडू आहे.
-
रोनाल्डोने सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल केला आहे. त्याने २००४ यूरो कपपासून आतापर्यंत पोर्तुगलसाठी ११ मोठ्या स्पर्धा खेळला आहे.
-
त्या सर्व स्पर्धेत त्याने गोल झळकावले आहेत. यात ५ यूरो कप, ४ फिफा वर्ल्ड कप, २०१७ कन्फेडरेशन कप आणि २०१९ युइएफए नेशंस लीगचा समावेश आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ख्रिस्तियानो रोनाल्डो / इन्स्टाग्राम)
पोर्तुगलच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने एका सामन्यात मोडले ६ विक्रम!
Web Title: Football player cristiano ronaldo records goals information uefa euro cup see photos sdn 96 rmt