क्रिकेटपटू मोहम्मद शमीपासून वेगळी राहणारी त्याची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. ती सतत तिचे फोटो शेअर करत असते. तिने इंस्टाग्रामवर एक नवा फोटो शेअर केला आहे, ज्यात तिने काळ्या रंगाचा वन-पीस ड्रेस घातला आहे. या ड्रेसवर काही नेटकऱ्यांनी हसीन जहाँला धर्माच्या नावाखाली ट्रोल केले. हसीन जहाँने यापूर्वीही तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिला तिच्या ड्रेससाठी काही लोकांनी धर्माच्या नावाखाली लक्ष्य केले होते. हसीन जहां मॉडेलिंग देखील करते. काही काळापूर्वी तिने राम मंदिराविषयी पोस्ट शेअर केली, तेव्हा त्याला बलात्काराच्या धमक्याही मिळाल्या. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचे लग्न ७ एप्रिल २०१४ साली झाले. ज्यानंतर दुसऱ्या महिलांशी त्याचे संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप हसीनने केला होता. हसीनने मोहम्मदवर बलात्काराचा आरोप देखील केला होता. -
हसीनने मोहम्मद शमीवर बलात्काराचा आरोप देखील केला होता.
हसीन जहाँचा ‘वन-पीस’ फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ!
धर्माच्या नावाखाली लोकांनी हसीन जहाँला केलं ट्रोल
Web Title: Hasin jahan shared one piece picture on instagram adn