-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा आज वाढदिवस.
-
क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीचे असंख्य चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक अक्षरश: वेडे होतात.
-
धोनी हा भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने ३३२ सामन्यांचे नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीने आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा तीन विजेतेपदे मिळवून दिली आहेत. याशिवाय त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२०चे विजेतेपदही जिंकले आहे.
-
महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी यांचं शिक्षण एकाच शाळेत झालं. पण तेव्हा हे दोघं एकमेकांना ओळखायचेसुद्धा नाही.
-
साक्षी आणि धोनीची पहिली भेट २००८ मध्ये कोलकाताच्या ताज हॉटेलमध्ये झाली. तेव्हा हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणानंतर साक्षीची तिथे ट्रेनिंग सुरु होती.
-
औरंगाबादमधून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतल्यानंतर साक्षी कोलकात्त्यातील हॉटेलमध्ये इंटर्नशिप करत होती.
-
तिथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली आणि दोन वर्षांनंतर ४ जुलै २०१० रोजी दोघांनी लग्न केलं.
-
धोनी आणि साक्षीचा विवाह संपूर्ण देशासाठीच आश्चर्याचा धक्का होता. कारण कोणाला काही कळू न देता अत्यंत गुपचूपपणे साध्या पद्धतीने हा विवाह करण्यात आला.
-
साक्षी आणि धोनीच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
लग्नानंतर पाच वर्षांनी सहा फेब्रुवारी २०१५ रोजी साक्षीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. झिवा असे त्यांच्या मुलीचे नाव आहे.
-
सोशल मीडियावर झिवाचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होतात.
-
साक्षी सोशल मीडियावर सुद्धा नेहमीच चर्चेत असते. माध्यमांध्ये धोनीच्या बरोबरीने साक्षीचीही चर्चा होते.
-
लग्न झाल्यापासूनच साक्षीने धोनीला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवासात खंबीर साथ दिली.
-
महेंद्रसिंह धोनीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
-
(सर्व फोटो सौजन्य : महेंद्रसिंह धोनी, साक्षी धोनी / इन्स्टाग्राम)
ते हॉटेल, पहिली भेट अन्…. फिल्मी वाटावी अशी धोनी-साक्षीची लव्हस्टोरी
Web Title: Former indian captain mahendra singh dhoni happy birthday special love story sakshi dhoni romantic photos sdn