-
भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. (फोटो सौजन्य : Reuters)
-
भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. (फोटो सौजन्य : Reuters)
-
सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. (फोटो सौजन्य : Reuters)
-
मीराबाईचा जन्म पूर्व इम्फाळ येथे सैखोम कुटुंबात ८ ऑगस्ट १९९४ मध्ये झाला.
-
शालेय जीवनात मीराने जेव्हा वेटलिफ्टिंग खेळाचा वसा उचलला, तेव्हा तिच्या गावात याचा सराव किंवा प्रशिक्षण देणारे केंद्र नव्हते.
-
मणिपूरमध्ये वेटलिफ्टिंगपटू कुंजराणी देवीचा आदर्श मानणारा मोठा वर्ग आहे. मीराबाईनेसुद्धा कुंजराणीकडूनच प्रेरणा घेतली. ती इतके वजन कसे काय पेलू शकते, याच इच्छाशक्तीने मीराने वेटलिफ्टिंगला प्रारंभ केला, तेव्हा आपल्याला पालकांना ते पटवून देण्याचे महत्त्वाचे आव्हान तिच्यापुढे होते आणि त्यांनी तिला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
-
वयाच्या १३व्या वर्षी ती दररोज ६० किलोमीटर अंतर रेल्वेने प्रवास करायची आणि खुमान लंपक क्रीडा संकुलात सराव करायची. येथूनच तिच्या स्वप्नांचा प्रवास सुरू झाला.
-
कनिष्ठ गटातील त्या दिवसांपासूनच तिच्या खेळातील सातत्य कायम होते. कनिष्ठ गटातील मीराच्या व्यावसायिक कारकीर्दीला जेव्हा प्रारंभ झाला, तेव्हा तिच्यापुढे अनंत अडचणी होत्या.
-
तिचे प्रशिक्षक तिला आहाराचा तक्ता द्यायचे. त्यात चिकन आणि दूध हे महत्त्वाचे घटक असायचे. मात्र त्या तक्त्याला न्याय देऊ शकणारी आर्थिक पुंजी तिच्या कुटुंबीयांकडे नव्हती; परंतु तिने हिमतीने अशा अनेक अडचणींवर मात केली. (फोटो सौजन्य : Reuters)
-
२०१३ मध्ये कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिला सर्वोत्तम लिफ्टर हा मान मिळाला.
-
२०११च्या आंतरराष्ट्रीय युवा अिजक्यपद स्पर्धेत आणि कनिष्ठ गटाच्या दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदकावर नाव कोरले.
-
मीराच्या याच कामगिरीमुळे ती भारताचे भविष्य असल्याची ग्वाही क्रीडा क्षेत्राला मिळाली होती.
-
मीराने ताश्कंद येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत कुंजराणीचा स्नॅचमधील विक्रम मोडीत काढत ८४ किलो वजन उचलले होते. याचप्रमाणे एकूण १९० किलो वजन उचलण्याच्या तिच्या विक्रमाचीही बरोबरी केली.
-
२०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या मीराने ४८ किलो वजनी गटात एकूण १७० किलो वजन उचलले होते.
-
२०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली होती. मात्र तिच्याकडून घोर निराशा झाली.
२०१८ – वर्ल्ड चॅंपियन मीराबाई चानू हिने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी करत देशाला आनंद साजरा करण्याची एक सुवर्णसंधी दिली. ४८ किलो वजनी गटातील वेटलिफ्टींग प्रकारात आपली छाप पाडत मिळालेल्या सर्व संधीचं मीराबाईने खऱ्या अर्थाने सोनं केलं आणि भारतीय गटात सुवर्णपदकाची भर दिली. (सर्व फोटो सौजन्य : मीराबाई चानू / ट्विटर)
अपेक्षांचं ओझं यशस्वीपणे उचलणारी वेटलिफ्टर! जाणून घ्या पदक विजेत्या मीराबाईबद्दल
Web Title: Tokyo olympics 2020 saikhom mirabai chanu weightlifting wins india first silver medal know about her struggle success story sdn