टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने आपल्या पहिल्याच प्रयत्नात थेट अंतिम फेरीत धडक मारली. अ गटातील पात्रता फेरीमधील कामगिरीच्या जोरावर नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आलाय. कामगिरीच्या आधारे ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनच्या नियमांनुसार थेट अंतिम फेरीत पोहचला. नीरजने पात्रता फेरीमध्ये फेकलेला भाला तब्बल ८६.६५ मीटरपर्यंत गेला आणि तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. नीरजने केलेल्या या भन्नाट कामगिरीनंतर तो खूप व्हायरल झाला. भारताचा 'हॅंडसम' भालाफेकपटू म्हणूनही तो ओळखला जातो. भालाफेक खेळात नीरज अचानक आला. त्याने जिम सोडलं आणि भाला फेकण्यास सुरुवात केली. त्याचे काका भीम चोप्रा यांनी सांगितले की, नीरज सुरुवातीला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नव्हता, त्यामुळे तो जिमला जायचा. जिम जवळ एक स्टेडियम होते, त्यामुळे अनेक वेळा तो तिथे फिरायला जायचा. एकदा काही मुले स्टेडियममध्ये भालाफेक करत होती. नीरज तिथे उभा राहिला आणि मग प्रशिक्षकाने त्याला सांगितले, की चल भाला फेकून दे, तू किती दूर फेकू शकतो ते बघ. नीरजने भाला फेकला, मग तो खूप दूर पडला. यानंतर प्रशिक्षकाने त्याला नियमित प्रशिक्षणासाठी येण्यास सांगितले. काही दिवस नीरजने पानिपत स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेतले, नंतर पंचकुलाला प्रशिक्षण सुरू केले. नीरजने आंतरराष्ट्रीय स्तरावर सहा प्रमुख स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. त्याने २०१८मध्ये जकार्ता एशियन गेम्स, गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स, २०१७मध्ये एशियन चॅम्पियनशिप, २०१६मध्ये दक्षिण आशियाई गेम्स, २०१६मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. २०१६मधील विश्वविक्रमानंतर सैन्याने नीरजला ज्युनियर कमिशनर ऑफिसर, नायब सुभेदार या पदावर नियुक्त केले. ऑलिम्पिक स्टेडियममध्ये ७ ऑगस्ट रोजी पुरुष भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. यात नीरजकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत.
IN PICS : ऑलिम्पिकमध्ये लक्ष वेधून घेणारा भारताचा ‘हॅंडसम’ भालाफेकपटू नीरज चोप्रा
Web Title: Tokyo olympics 2020 watch photos of indias handsome javelin thrower neeraj chopra adn