• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. youngest players in olympics 2020 quan hongchan hend zaza momiji nishiya funa nakayama rayssa leal scsg

१३ वर्षाची गोल्ड मेडलिस्ट; १४ वर्षांची सुवर्णकन्या अन् १२ वर्षांची टेबल टेनिसपटू; Olympics मधील ‘छोटा पैकेट बड़ा धमाका’

मूर्ती लहान पण किर्ती महान असच या खेळाडूंचं वय आणि त्यांनी केलेली कामगिरी पाहिल्यावर म्हणावसं वाटेल

August 6, 2021 07:59 IST
Follow Us
  • Youngest players in olympics 2020 QUAN Hongchan Hend Zaza Momiji Nishiya Funa Nakayama Rayssa Leal
    1/30

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकणाऱ्या देशांमध्ये चीन आघाडीवर आहे. चीनने ५ ऑगस्टपर्यंत तब्बल ३३ सुवर्णपदकं या स्पर्धेत जिंकली आहेत. गुरुवारी झालेल्या माहिलांच्या डायव्हिंग १० मीटर स्पर्धेमध्ये चीनच्या क्वान हँन्गचैन या मुलीने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.

  • 2/30

    क्वान ही केवळ १४ वर्षांची आहे.

  • 3/30

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या चीनच्या ऑलिम्पिक चमूमधील क्वान ही वयाने सर्वात लहान सदस्य आहे.

  • 4/30

    क्वानने या स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्येही पहिलं स्थान मिळवलं होतं.

  • 5/30

    नंतर अंतिम फेरीमध्येही क्वानने आपल्या कामगिरीमधील सातत्य कायम राखत सुवर्णपदक पटकावलं.

  • 6/30

    टोक्यो एक्वटिक्स सेंटरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये क्वानने एक नाही तर दोनवेळा परफेक्ट १० स्कोअर केला.

  • 7/30

    एवढ्या कमी वयाच्या खेळाडूने सलग दोनदा परफेक्ट १० स्कोअर करणे हा देखील एक विक्रमच आहे.

  • 8/30

    क्वानने एकूण ४६६.२० अंक मिळवले.

  • 9/30

    रौप्यपदकही चीनच्याच महिला खेळाडूला मिळालं. चेन यूक्सीने ४३५.४० अंकांची कमाई करत रौप्यपदकावर नाव कोरलं.

  • 10/30

    क्वानला पदक मिळाल्याचं समजल्यानंतर तिच्या प्रशिक्षकांनी तिला असं उचलून घेतलं.

  • 11/30

    क्वान ही चीनच्या सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक असण्याबरोबरच भविष्यामधील महत्वाची खेळाडू अशीही ओळख निर्माण करु पाहत आहे.

  • 12/30

    क्वानने केलेली कामगिरी ही चीनच्या दृष्टीने महत्वाची आहे कारण आता क्वानच्या यशामुळे काही ठराविक खेळाडूंवर सुवर्णपदकासाठी अवलंबून राहवं लागणार नाही असं स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत चीनचे काही ठराविक खेळाडूच सुवर्णपदकाचे दावेदार समजले जायचे.

  • 13/30

    मात्र या सामन्यामधील परफेक्ट टेन पाहिल्यानंतर आता क्वानकडून अपेक्षा वाढल्यात.

  • 14/30

    ज्या सामन्यात क्वानने सुवर्णपदक जिंकलं त्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वू मलेसाने कांस्यपदक पटकावलं.

  • 15/30

    जगभरामधून क्वानचं तिच्या कामगिरीसाठी कौतुक होताना दिसत आहे.

  • 16/30

    चीनच्या क्वानसोबतच इतर देशांमधील कमी वयाच्या खेळाडूंनी या ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीची दखल संपूर्ण जगाला घ्यायला भाग पाडलं आहे.

  • 17/30

    स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या जपानच्याच मोमिज निशियाने महिला स्ट्रीट स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे.

  • 18/30

    निशियाने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ही कामगिरी केलीय.

  • 19/30

    ऑलिम्पिकमध्ये सर्वात कमी वयात सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रमही निशियाने आपल्या नावावर केलाय.

  • 20/30

    निशियाने १३ वर्षे ३३० दिवस वय असताना सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.

  • 21/30

    विशेष म्हणजे स्केटबोर्डिंगला पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आलं आहे. 

  • 22/30

    त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्केटबोर्डिंग स्पर्धेमध्ये निशियाने सुवर्णपदक जिंकलं त्याच स्पर्धेतील रौप्यपदक ब्राझीलच्या रेयस्सा लीलने जिंकलं.

  • 23/30

    रेयस्सा ही १३ वर्षांचीच आहे. याशिवाय या स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या जपानच्याच फुना या मुलीचं वय १६ वर्षे आहे.

  • 24/30

    म्हणजेच तिन्हीही पदक विजेत्या या १७ वर्षांखालील आहेत.

  • सीरियाचा हेंड जाजा ही अवघ्या १२ वर्षांची असून ती ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालीय.
  • 25/30

    टेबल टेनिसच्या महिला सिंगल्समध्ये जाजा सहभागी झाली होती.

  • 26/30

    मात्र ३९ वर्षीय ऑस्ट्रियन महिला खेळाडू ल्यू जियाविरुद्धचा सामना पराभूत झाल्याने जाजा स्पर्धेबाहेर गेली. जाजाला पराभूत करणाऱ्या ल्यूची ही सहावी ऑलिम्पिक स्पर्धा आहे.

  • 27/30

    सोप्या शब्दात सांगायंच झाल्यास जाजाचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा तिची प्रतिस्पर्धी असणाऱ्या ल्यूने तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता.

  • 28/30

    टोक्योमधील तरुण खेळाडूंमध्ये जपानची १२ वर्षांची कोकाना हिराकीसुद्धा झाली होती. ती स्केटबोर्डिंग करते.

  • 29/30

    उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये जपानकडून खेळणारी कोकाना सर्वात लहान वयाची खेळाडू आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

Web Title: Youngest players in olympics 2020 quan hongchan hend zaza momiji nishiya funa nakayama rayssa leal scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.