• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. tokyo olympic emotional scenes as victorious indian hockey players get their medals sgy

Tokyo Olympic 2020: गळ्यात मेडल पाहून हॉकी खेळाडूंना अश्रू अनावर; पहा ‘तो’ भावनिक क्षण

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला

August 6, 2021 09:44 IST
Follow Us
  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला.
    1/15

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला.

  • 2/15

    ऑलिम्पिक हॉकीमधील ४१ वर्षांच्या ‘पदकदुष्काळास’ गुरुवारी भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘कांस्यविराम’ दिला.

  • 3/15

    ऑलिम्पिकमधील आठ सुवर्णपदकांचा इतिहास गाठीशी असलेल्या भारताने रोमहर्षक लढतीत बलाढय़ जर्मनीचा ५-४ असा पाडाव करीत हे यश मिळवले.

  • 4/15

    मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हॉकीतील शिलेदारांनी बलाढ्य जर्मनीला ५-४ असे नेस्तनाबूत केले.

  • 5/15

    त्यामुळे १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर भारताला पदकाचे दर्शन घेता आले. राष्ट्रीय खेळातील या कामगिरीमुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे.

  • 6/15

    दरम्यान विजयानंतर भारतीय संघाचे खेळाडू पदक स्विकारतानाचा व्हिडीओ ट्विटरला शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत भारतीय खेळाडू पदक स्वीकारण्यासाठी जात असताना दिसत आहेत.

  • 7/15

    तसंच तब्बल ४० वर्षानंतर मिळालेलं हे पदक गळ्यात घालताना एकमेकांना मदत करत होते.

  • 8/15

    यावेळी गळ्यातील मेडल पाहून काही खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते.

  • 9/15

    खेळाडूंसोबत संपूर्ण देशवासियांसाठी हा भावनिक क्षण होता.

  • 10/15

    हॉकीच्या इतिहासात संस्मरणीय यशाचा अध्याय लिहिताना १-३ अशा दोन गोलच्या पिछाडीनंतर दिमाखदार आगेकूच केली.

  • 11/15

    सामना संपल्याची शिटी वाजताच कर्णधार मनप्रीत सिंग आणि ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्यासह संपूर्ण भारतीय संघाने जल्लोष साजरा केला.

  • 12/15

    अनेकांचे डोळे यावेळी पाणावले होते.

  • 13/15

    भारताचे हे १२वे ऑलिम्पिक पदक ठरले. १९६८मध्ये मेक्सिको सिटी आणि १९७२मध्ये म्युनिच येथील ऑलिम्पिकनंतर हे भारताने मिळवलेले तिसरे कांस्यपदक ठरले.

  • 14/15

    गेल्या तीन वर्षांत केलेली प्रचंड मेहनत आणि त्यागानंतर अखेर हे फळ मिळाले आहे. भारतीय हॉकी संघाच्या यशस्वी वाटचालीत प्रशिक्षक म्हणून योगदान देता आल्याचा आनंद आहे. हे पदक भारतीय हॉकीचे रूप पालटणारे ठरेल अशी प्रतिक्रिया भारताचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी दिली आहे.

  • (Photos: #Tokyo2020 for India Twitter Video Screengrab)

Web Title: Tokyo olympic emotional scenes as victorious indian hockey players get their medals sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.