-
भारतात आंतरधर्मिय विवाहाच्या मुद्द्यावरून वादविवाद झडत असतात. पण, प्रेमात आड येणाऱ्या धर्माला बाजूला सारून अनेकजणांनी संसार थाटले आणि आता सुखात संसारही करत आहेत. क्रिकेटच मैदान गाजवणाऱ्या पाच क्रिकेटपटूंच्या आंतरधर्मीय विवाहाचे पाच किस्से…
-
माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलेल्या नवाब मन्सूर अली खान यांनी चित्रपट अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी प्रेमविवाह केला होता. एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली. शर्मिला टागोर या हिंदू आहेत. त्या दोघांना तीन मुलं आहेत, ज्यांची नावं सैफ अली खान, सोहा अली खान आणि सबा खान अशी आहेत.
-
क्रिकेटपटू मोहम्मद अजरुद्दीन आणि अभिनेत्री संगीता बिजलानी यांची प्रेमकहानी खूप गाजली. नंतर दोघांनी लग्न केलं. पण दोघांचा संसार नंतर मोडला.
-
भारतासाठी क्रिकेट खेळलेल्या सबा करीम यांनी १९८९ मध्ये रश्मी राय यांच्याशी निकाह केला होता. रश्मी राय धर्माने हिंदू होत्या. दोघांनी प्रेमविवाह केला होता. दोघांना एक मुलगी आहे.
-
क्षेत्ररक्षणासाठी ज्याचं नाव नेहमी घेतलं असा भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही आंतरधर्मिय विवाह केलेला आहे. कैफने पूजा यादवसोबत प्रेमविवाह केला. दोघांना दोन मुलं आहेत.
-
भारताचा सलामीचा गोलंदाज जहीर खाननंही धर्म जात बाजूला सारून अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत लग्न केलं.
मैदान गाजवणारे पाच क्रिकेटपटू, ज्यांनी हिंदू मुलीसोबत थाटला संसार
Web Title: List of muslim indian cricketers who got married to actress hindu girls know about family childrens photos sdn