• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. tokyo olympics 2021 india total seven medal list winners list nrp

Olympic 2020 : भारताचे सात पराक्रमी पदकविजेते

August 7, 2021 18:56 IST
Follow Us
  • भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आज भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवून नवा इतिहास घडवला आहे. नीरज चोप्राने भारताला आज सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.
    1/25

    भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आज भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवून नवा इतिहास घडवला आहे. नीरज चोप्राने भारताला आज सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.

  • 2/25

    २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदकं जिंकली होती.

  • 3/25

    त्यानंतर आता २०२१ मध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.

  • 4/25

    नीरज चोप्रा – सुवर्णपदक

  • 5/25

    टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे.

  • 6/25

    मीराबाई चानू – रौप्यपदक

  • 7/25

    यंदा टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळाले. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिले पदक मिळून दिले.

  • 8/25

    भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. याआधी सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते.

  • 9/25

    पीव्ही सिंधू – कांस्यपदक

  • 10/25

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला.

  • 11/25

    या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले.

  • 12/25

    लव्हलिना बोर्गोहेन – कांस्यपदक

  • 13/25

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला.

  • 14/25

    उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे.

  • 15/25

    रवी दहिया – रौप्यपदक

  • 16/25

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कामगिरी केली आहे. मात्र ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

  • 17/25

    फायनलमध्ये रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना ७-४ ने जिंकला. त्यामुळे रवीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

  • 18/25

    पुरुष हॉकी संघ – कांस्यपदक

  • 19/25

    तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव केला.

  • 20/25

    सुरुवातीला आघाडी घेतलेल्या जर्मनीला भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत पराभवाची धूळ चारली.

  • 21/25

    दरम्यान यलो कार्डमुळे मैदानात एक खेळाडू कमी असल्याने जर्मनीने मोठा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची खेळी पाहून जर्मनी गोलकीपरशिवाय खेळली.

  • 22/25

    अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जर्मनीने भारतासोबत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेशने अगदी शेवटच्या क्षणी जर्मनीला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवरील प्रयत्न हाणून पाडत भारताला विजय मिळवून दिला.

  • 23/25

    भारताने सांघिक खेळाच्या जोरावर तब्बल ४१ वर्षांनी कांस्यपदकावर नाव कोरलं आहे.

  • 24/25

    बजरंग पुनिया – कांस्यपदक

  • 25/25

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले. (फोटो सौजन्य- ट्वीटर)

Web Title: Tokyo olympics 2021 india total seven medal list winners list nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.