-
भारतासाठी ७ ऑगस्ट २०२१ ही तारीख ऐतिहासिक ठरली आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवत नवा इतिहास रचला आहे.
-
ऑलिम्पिक स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये पदक मिळवणारा नीरज भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. नीरजने पात्रता फेरीतच आपले कौशल्य सिद्ध केले होते.
-
प्रत्येक खेळाडूप्रमाणे नीरजलाही ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. गरीब शेतकरी कुटुंबातील नीरजने कमावलेल्याच्या यशामागे एक प्रेरणादायी कथा आहे.
-
नीरज चोप्राच्या सुवर्णपदकाची यशोगाथा वजन कमी करण्यापासून सुरू होते. वयाच्या १०-११ व्या वर्षी नीरज चोप्राचे वजन जास्त होते. वडील आणि काकांनी नीरजला त्याचे वजन कमी करण्यासाठी पानिपतच्या शिवाजी स्टेडियममध्ये पाठवले, जिथे त्याला अनेक खेळ खेळवले गेले.
-
नीरज चोप्राचे वजन खूप जास्त होते, त्यामुळे तो ना वेगाने धावू शकत होता, ना लांब उडी आणि उंच उडी मारू शकत होता. एके दिवशी, त्याच्या मित्रांसोबत फिरत असताना, नीरजने काही खेळाडूंना स्टेडियममध्ये भाला फेकताना पाहिले.
-
नीरजनेही गमतीने भाला उचलला आणि पूर्ण शक्तीने फेकला. नीरजची भालाफेक पाहून सगळेच स्तब्ध झाले. वयाच्या ११व्या वर्षी नीरज चोप्राने २५ मीटरपेक्षा जास्त दूर तो भाला फेकला. त्यानंतर नीरज स्वतः या खेळाच्या इतक्या प्रेमात पडला. त्याने रोज ७-८ तास भाला फेकण्याचा सराव सुरू केला.
-
नीरज चोप्राने भाला उचलला, पण आता त्याच्यासमोर सर्वात मोठी समस्या होती ती गरिबीची. नीरज एक शेतकरी कुटुंबातील आहे, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. एकूण १७ सदस्य असलेल्या कुटुंबात नीरज राहत होता.
-
नीरजला सात हजार रुपयांचा भाला मिळणेही शक्य नव्हते. तसे, एका भाल्याची किंमत त्यावेळी दीड लाख रुपये होती. नीरजच्या हातात एक स्वस्त भाला होता, पण असे असूनही त्याचा आत्मविश्वास कमालीचा होता. त्याने भाला फेकण्याचा सराव सुरू केला आणि तो तासनतास सराव करू लागला.
-
नीरज चोप्राने प्रशिक्षक नसतानाही हार मानली नाही. त्याने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून भाला फेकण्याचे प्रशिक्षण घेतले. तो दररोज व्हिडीओ बघायचा. शेतात त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करायचा. लवकरच नीरज चोप्राने यमुनानगरमध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
-
नीरजने आपले सुवर्णपदक ‘फ्लाइंग सिख’ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित केले. ”मी माझे हे सुवर्णपदक महान मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. कदाचित ते मला स्वर्गातून बघत असतील. मी कधीच सुवर्णपदक जिंकण्याचा विचार केला नव्हता, पण काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. मला माहीत होते, की आज मी माझे सर्वोत्तम काम करेन. मला ऑलिम्पिक स्पर्धेचा विक्रम मोडायचा होता.”असे नीरज चोप्रा म्हणाला.
-
"मला पदकासह मिल्खा सिंग यांना भेटायचे होते. त्यांनी हे पदक पीटी उषा आणि त्या खेळाडूंना समर्पित केले जे ऑलिम्पिक पदके जिंकण्याच्या जवळ पोहोचले होते, परंतु यशस्वी होऊ शकले नाहीत. जेव्हा राष्ट्रगीत सुरू होते आणि भारतीय तिरंगा वर जात होता, तेव्हा मी रडणार होतो.” असे नीरज चोप्राने सांगितले.
-
नीरज स्पर्धेदरम्यान सॅलेड आणि फळं खातो. तसेच ज्या देशात स्पर्धा असेल, त्या देशातील खाण्याला तो पहिली पसंती देतो. नुकतंच त्याने आपल्या आहारात सॉलमन मासा समाविष्ट केला आहे.
-
फास्ट फूडमध्ये नीरजला पाणीपुरी खूप आवडते. कारण त्यात सर्वात जास्त पाणी असल्याने कोणतंच नुकसान होत नाही, असं त्याचं म्हणणं आहे.
-
नीरजला ब्रेड ऑमलेट खायला सर्वात जास्त आवडतं. तसेच गोड पदार्थ खायलाही त्याला आवडतात. नीरजला भाताची खिचडी तयार करायला आवडते.
-
ऑलिम्पिकसाठी नीरज चोप्रानं ५ वर्षांपूर्वीच म्हणजे २०१६ मध्येच तयारी सुरू केल्याचं त्याने म्हटलं आहे.
-
नीरज चोप्रानं भारताला ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात गोल्ड मेडल जिंकून दिल्यानंतर त्याच्या जुन्या मुलाखतीचा एक भाग व्हायरल होत आहे.
-
नीरज चोप्रानं एका मुलाखतीदरम्यान या स्पर्धेच्या तयारीसाठी भाष्य केले होते. “ऑलिम्पिकसाठी तर खूप जास्त काम केलंय. ती जगातली सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. त्यामुळे त्यासाठी आत्तापासूनच तयारी करावी लागेल”, असं नीरज चोप्राने म्हटले.
-
“ऑलिम्पिकसाठी जोरदार तयारी करावी लागेल. माझा सध्याचाच परफॉर्मन्स कायम राहिला, तर मी विश्वास देतो, की आपल्या देशासाठी नक्कीच मेडल जिंकून आणेन”, असं नीरजने सांगितले.
-
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे.
-
नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता.
युट्यूबवर व्हिडीओ पाहून नीरज चोप्राने घेतलं होतं प्रशिक्षण; जाणून घ्या ‘गोल्डन’ बॉयबद्दल माहिती नसलेल्या रंजक गोष्टी
Web Title: Neeraj chopra gold medalist in tokyo olympics 2020 know some interesting facts nrp