Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. know about sportsperson devendra jhajharia javelin thrower paralympic gold rio khel ratna padma shri arjuna awardee information career success story photos sdn

नीरज चोप्रा नाही तर ‘हा’ आहे भालाफेकमधील पहिला सुवर्णपदक विजेता; दोन सुवर्णपदकं मिळवूनही देशवासियांना विसर

August 11, 2021 17:36 IST
Follow Us
  • Devendra Jhajharia Javelin Thrower Paralympic Gold Information Career Photos
    1/25

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकलं आणि सगळीकडे नीरज चोप्राच्या नावाची चर्चा सुरु झाली. (Reuters Photo)

  • 2/25

    क्रिकेटवेड्या भारतात ऑल्पिम्पिकचं यश साजरं होत असल्याने अनेकजण आनंद व्यक्त करत आहेत. पण क्रिकेटमुळेच म्हणा किंवा अन्य इतर कारणांमुळे अनेकांना भारताने याआधीही भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे हे माहितीच नाही.

  • 3/25

    तुम्ही देवेंद्र झाझरिया हे नाव कधी ऐकलंय का? नाही ना…

  • 4/25

    देवेंद्र झाझरियाने सर्वात प्रथम भालाफेकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली आहे. (AP Photo)

  • 5/25

    देवेंद्र झाझरियाच्या आधी कोणत्याही भारतीय खेळाडूने ही कामगिरी केली नव्हती. पण दुर्दैवाने त्याचं हे यश भारतीयांनी दुर्लक्षित केलं आणि साजरंही झालं नाही.

  • 6/25

    भारताच्या याच अनसंग हिरोबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

  • 7/25

    सामान्य लोकांसारखे आपण नसलो तरी किंवा त्यांच्यासारखे सर्व अवयव नसले तरीही त्याचे दु:ख करीत बसण्यापेक्षा आहे त्यामध्ये समाधान मानून मुलखावेगळी कामगिरी करणारे फारच थोडे असतात. राजस्थानमधील चुरू जिल्हय़ातील रहिवासी देवेंद्र झाझरिया हा अशाच मुलखावेगळय़ा खेळाडूंमध्ये मोडतो.

  • 8/25

    ज्या वयात आपल्या मित्रांसमवेत खूप मजामस्ती करावीशी वाटत असते, त्याच वयात त्याच्यावर हा प्रसंग गुदरला. तो झाडावर चढला असताना विजेच्या तारेचा धक्का त्याला बसला. त्यामुळे त्याचा डावा हात निकामी झाला.

  • 9/25

    वैद्यकीय तज्ज्ञांनी कृत्रिम पायाखेरीज अन्य कोणताही पर्याय नसल्याचे सांगितल्यानंतर त्याच्या घरच्यांना मानसिक धक्का बसला नाही तर नवलच! वयाच्या ८ व्या वर्षी त्याला डावा कृत्रिम हात बसवावा लागला.

  • 10/25

    देवेंद्र अन्य सामान्य मुलांबरोबरच शाळेत जात असे. तेथे त्याने फुटबॉलसह अनेक खेळांचा आनंद घेतला.

  • 11/25

    द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रिपुदमनसिंग यांनी देवेंद्रमधील नैपुण्य हेरले. या मुलामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये देवेंद्रला मैदानी स्पर्धामधील क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुरू-शिष्यांची ही जोडी झकास जमली.

  • 12/25

    दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण देणे ही काही सोपी गोष्ट नसते. त्यामध्ये शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसह अनेक समस्यांचा अडथळा असतो. त्याचप्रमाणे अशा खेळाडूंच्या घरच्यांचा विश्वास संपादन करणे हीदेखील अवघड कामगिरी असते. सुदैवाने रिपुदमन व देवेंद्र यांना या अडचणी आल्या नाहीत.

  • 13/25

    अवघ्या पाच वर्षांच्या सरावानंतर देवेंद्र याने २००२ मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. तेथून त्याने मागे पाहिलेलेच नाही.

  • 14/25

    २००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्याने भालाफेकीत सुवर्णपदक पटकाविले.

  • 15/25

    पुन्हा त्याने २०१६ मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली.

  • 16/25

    कोणत्याही भारतीय खेळाडूने ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकं जिंकलेली नाहीत.

  • 17/25

    देवेंद्रचा हा रेकॉर्ड अद्यापपर्यंत कोणीही तोडू शकलेलं नाही.

  • 18/25

    या दोन सुवर्णपदकांखेरीज त्याने अनेक आंतरराष्ट्रीय पदकांची लयलूट केली आहे, तसेच त्याने विश्वविक्रमांचीही नोंद केली आहे.

  • 19/25

    २००४ मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • 20/25

    २०१२मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पद्मश्री पुरस्कार मिळवणारा तो पहिला पॅरालिम्पियनपटू ठरला होता.

  • 21/25

    देशाच्या क्रीडा क्षेत्रातील राजीव गांधी खेलरत्न जो आता मेजर ध्यानचंद नावाने ओळखला जातो तो सर्वोच्च पुरस्कार त्याला २०१७ मध्ये देण्यात आला. हा मान मिळविणारा तो पहिलाच दिव्यांग खेळाडू ठरला होता.

  • 22/25

    "न्याय मिळायला १२ वर्ष लागली. २००४मध्ये मी अ‍ॅथेन्स पॅरालिम्पिक स्पध्रेत विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी खेलरत्न पुरस्कार मिळाला असता, तर दिव्यांग खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली असती. एक तप मी खेळासाठी समर्पित केले आणि त्याचे फळ २०१७ मध्ये मिळताना दिसत आहे. इतक्या वर्षांच्या संघर्षांनंतर आमच्या ‘मन की बात’ जाणली जात आहे," अशी प्रतिक्रिया त्याने त्यावेळी लोकसत्ताशी बोलताना दिली होती.

  • 23/25

    आयुष्यात कधी पराभव मानू नका. देवेंद्र झाझरियाने पराभव मानला असता, परिस्थितीसमोर शरणागती पत्करली असती, तर आज त्याचे नाव कुठेच नसते.

  • 24/25

    एक ग्रामीण भागातील खेळाडू विश्वविक्रमवीर झाला. हे मला जमले, तर तुम्हालाही जमू शकते असं देवेंद्र दिव्यांग किंवा सर्वसाधारण खेळाडूंना सांगतो.

  • 25/25

    (सर्व फोटो सौजन्य : देवेंद्र झाझरिया / ट्विटर)

Web Title: Know about sportsperson devendra jhajharia javelin thrower paralympic gold rio khel ratna padma shri arjuna awardee information career success story photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.