-
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धा सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहे. येत्या २४ ऑगस्टपासून टोक्योमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
-
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतातील ५४ खेळाडू सहभागी होणार आहे. हे स्पर्धक विविध क्रीडा प्रकारात त्यांचे कौशल्य दाखवण्यास सज्ज झाले आहे.
-
गोळाफेक या क्रीडा प्रकारात हवालदार सोमन राणा यांचे नाव जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी घेतले जाते.
-
सोमन राणा हे पहिल्यांदाच पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत.
आर्मी स्पोर्टस कंट्रोल बोर्डाच्या पुण्यातील खडकी येथील लष्करी पॅरालिंपिक केंद्रातील हवालदार राणा महत्त्वाचे खेळाडू आहेत. -
हवालदार राणा हे मूळचे शिलाँग येथील रहिवासी आहेत. सैन्यात भरती झाल्यानंतर सोमण हे चांगले बॉक्सर होते.
-
जवळपास १४ वर्षांपूर्वी २००६ मध्ये देशाच्या सीमाभागात कर्तव्य बजावत असताना सुरुंग स्फोटात हवालदार राणा यांनी उजवा पाय गमावला. बहुतेक वेळा पायाला झालेल्या दुखापतीमुळे क्रीडापटूच्या कारकिर्दीचा अंत होतो.
-
मात्र, हवालदार राणा यांनी अनेक अडथळ्यांवर मात करत २०१७ मध्ये लष्कराच्या पॅरालिंपिक केंद्रात प्रवेश केला. यावेळी राणा यांच्या हातात बॉक्सिंगचे ग्लोव्हज नव्हे तर गोळा होता.
-
सोमन राणा यांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत टय़ुनिस पॅरा चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. १९ व्या राष्ट्रीय पॅरास्पोर्टस चँपियनशिप स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली.
-
त्यामुळे टोकियो येथील पॅरालिंपिक स्पर्धेत पदकाचा प्रबळ दावेदार म्हणून सोमन राणांकडे पाहिले जात आहे. लष्करी पॅरालिंपिक केंद्रातील खेळाडूंनी जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्व क्रीडा स्पर्धामध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
तसेच, २०१७ पासून आतापर्यंत तब्बल २८ आंतरराष्ट्रीय तर ६० राष्ट्रीय पदकांवर भारताचे नाव कोरले आहे. विशेष म्हणजे ते उत्कृष्ट भालाफेकपटूही आहेत.
सुरुंग स्फोटात पाय गमावूनही जिद्द कायम; भारतासाठी ८८ पदकं जिंकणाऱ्या सोमन राणांचा प्रेरणादायी प्रवास
Web Title: Para athlete soman rana tokyo paralympics 2020 who lost leg in mine blast nrp