-
टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण भारताला ही भेट दिली आहे.
-
भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.
-
टोक्यो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे.
-
अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाबेनचा ३-० असा पराभव केला.
-
टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे.
-
पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत.
-
भारताच्या भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता.
-
३४ वर्षीय भाविनाबेनने शनिवारी क्लास ४च्या उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता.
-
भाविनाने भारतीय शिबिरातील सर्वांना चकित करून जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ७-११, ११-७, ११-४, ९-११, ११-८ ने पराभूत केले होते.
-
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात लहान किराणा दुकान चालवणाऱ्या हसमुखभाई पटेल यांची मुलगी असलेली भाविना सुवर्ण पदकाची दावेदार मानली जात होती.
-
पण अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूनकडून पराभव झाल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. भाविनाच्या या उत्कृष्ट कामगिरीने इतिहास रचला आहे.
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी, भावना पटेलची रौप्य पदकाची कमाई
Web Title: Women singles table tennis class 4 bhavina patel wins historic silver medal at tokyo paralympics nrp