-
टोक्यो पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतासाठी शनिवारचा दिवस अतिशय खास दिवस ठरला आहे.
-
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला आतापर्यंत १७ पदकं मिळाली आहे.
-
यात ४ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे.
-
उद्या ५ सप्टेंबरला टोक्यो पॅरालिम्पिकची सांगता होणार आहे.
-
मात्र यंदाची टोक्यो पॅरालिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरली आहे, कारण भारताच्या पारड्यात आतापर्यंत १७ पदकं जमा झाली आहेत.
-
पुरुषांच्या SL3 प्रकारात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले.
-
भारतीय नेमबाज अवनी लेखराने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले आहे. यंदाच्या पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
-
भालाफेकपटू सुमित अंतिलने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.
-
विशेष म्हणजे सुमितने एफ-६४ प्रकारात ६८.५५ मीटर लांब भाला फेकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
-
भारताच्या मनीष नरवाल याने पी४ मिश्रित ५० मीटर पिस्तूल एसएच१ नेमबाजीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
-
१९ वर्षीय नरवालने २१८.२ गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये विक्रम केला आहे.
-
टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. परंतु तिने ऐतिहासिक रौप्यपदकावर मोहोर उमटवली.
-
उंच उडीपटू निशाद कुमारने २.०६ मीटर अंतरावर झेप घेत रौप्यपदक कमावले.
-
देवेंद्र झाझरियाने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक (एफ४६ श्रेणी) मध्ये चांगली कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली.
-
योगेश कथुरियाने ४४.३८ मीटरचा सर्वोत्तम थ्रो टाकत रौप्य पदक पटकावले.
-
भारतीय खेळाडू मरिअप्पन थंगवेलूने उंच उडीत रौप्यपदक पटकावले. मरिअप्पनने पुरुषांच्या उंच उडी टी-६३ प्रकारामध्ये रौप्यपदक जिंकले.
-
नेमबाज सिंहराज अधाना याने पी४ मिश्रित ५० मीटर एअर पिस्टल प्रकारात रौप्यपदक पटकावले.
-
उंच उडी प्रकारामध्ये प्रवीण कुमारने रौप्यपदकावर नाव कोरलं आहे. पुरुष उंच उडी टी ६४ प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली.
-
भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे.
-
शरद कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी-६३ प्रकारामध्ये कांस्यपदक जिंकले.
-
तर सिंहराज अधाना याने १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ फायनलमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. सिंहराजने २१६.८ गुणांसह कांस्य जिंकले.
-
सुंदरसिंग गुर्जर हा भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला.
तिरंदाज हरविंदर सिंगने कोरियाच्या सू मिन किमचा पराभव करत कांस्यपदक जिंकले. त्याने हा सामना ६-५ ने जिंकला. -
पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने प्रथमच तिरंदाजीमध्ये पदक पटकावले आहे.
-
तर मनोज सरकारने पुरुषांच्या SL3 प्रकारात कांस्यपदक पटकावले. यात त्याने जपानच्या डेसुके फुजीहाराला पराभूत केले.
तब्बल १७ पदकं, टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा डंका; जाणून घ्या कोणी काय जिंकलं?
Web Title: India tokyo 2020 paralympics medal winners list indian athletes medals at tokyo paralympics nrp