-
कपडे धुण्याच्या धोक्याने खेळण्यापासून ते आज ‘भारताचा ख्रिस गेल’ अशी ओळख मिळवणाऱ्या खेळाडूचा प्रवास आज आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)
-
आयपीएल २०२१ मध्ये महिपाल लोमरोरने पहिल्याच संघीचं सोनं केल्याचं पहायला मिळालं.
-
राजस्थान रॉयल्सच्या या २१ वर्षीय खेळाडूने १७ चेंडूंमध्ये ४३ धावांची जबरदस्त खेळी केली.
-
आपल्या खेळीमध्ये महिपालने चार षटकार आणि दोन चौकार लगावले.
-
हे पाहा महिपालच्या फटकेबाजीचं वॅगनवील.
-
पंजाबविरुद्धच्या सामन्यातील या चार षटकारांसाठी त्याला सोमवारी विशेष पुरस्कारही मिळाला.
-
महिपाल हा एक अष्टपैलू खेळाडू आहे.
-
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला तेव्हा महिपाल त्यात महत्वाचा खेळाडू होता.
-
भारतीय संघाचं भवितव्य म्हणून ज्या मोजक्या खेळाडूंकडे पाहिलं जात त्यामध्ये महिपालचंही नाव आहे.
-
जस्थानकडून खेळणारा महिपाल हा राजस्थानमधील नागौर येथील रहिवाशी आहे.
-
मोठं होऊन क्रिकेटर बनायचं हे महिपालचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं.
-
महिपालची आजी सिणागारी देवी यांनी एका मुलाखतीमध्ये महिपालच्या लहानपणीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला होता.
-
लहानपणी महिपाल क्रिकेट खेळण्याचा हट्ट करु लागला आणि त्यानंतर तो कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धोक्याने क्रिकेट खेळू लागला, असं त्यांची आजी सांगते.
-
महिपालचा हट्ट पाहून त्याला अखेर एक बॅट विकत घेऊन दिली असंही आजींनी सांगितलं होतं.
-
बॅट मिळाल्यानंतर घरासमोरच्या गल्लीलाच महिपालने आपल्या सरावाचं मैदान करुन तिथे तो क्रिकेट खेळू लागला. त्याला त्याची मोठी बहीण गोलंदाजी करायची, असं या आजींनी सांगितलं.
-
घरासमोरच्या गल्लीतून सुरु झालेला महिपालचा प्रवास आज आयपीएलपर्यंत येऊन पोहचलाय.
-
महिपालने अगदी लहान वयामध्येच आपलं घर सोडलं.
-
महिपालच्या वडिलांनी त्याला वयाच्या ११ व्या वर्षीच नागौरमधून जयपूरला पाठवलं.
-
महिपालच्या वडिलांचा त्याच्या क्रिकेटच्या प्रेमाला पाठिंबा होता.
-
महिपालच्या वडिलांचा त्याच्या क्रिकेटच्या प्रेमाला पाठिंबा होता.
-
त्यामुळेच नागौरमध्ये क्रिकेटसंदर्भातील सुविधा चांगल्या नसल्याने त्याला जयपूरला पाठवण्याचा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला.
-
विशेष म्हणजे महिपालची देखभाल करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी आजीसुद्धा त्याच्यासोबत जयपूरला शिफ्ट झाली.
-
महिपाल हा त्याच्या ओळखीच्या लोकांमध्ये ज्युनियर ख्रिस गेल म्हणून लोकप्रिय आहे.
-
महिपाल हा अगदी सहज चेंडू टोलवतो आणि फार लांब पर्यंत फटके मारण्यामध्ये तो फार माहीर आहे.
-
महिपाल हा डावखुरा फिरकी गोलंदाजही आहे.
-
१४ वर्षांखालील वेरॉक शील्डच्या अंतिम सामन्यामध्ये महिपालने २५० धावा केल्या होत्या.
-
या खेळीनंतर भारताचे माजी विकेटकीपर फलंदाज चंद्रकांत पंडित यांनीच महिपालला भारतीय ख्रिस गेल असं नाव दिलं होतं.
-
राजस्थानच्या १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील संघामध्ये महिपाल आणि ऋषभ पंत एकत्र खेळायचे. दोघांच्या जोडीला ‘जय विरु’ची जोडी असं म्हटलं जायचं. दोघे बराच काळ एकत्र क्रिकेट खेळले आहेत.
-
नंतर पंत दिल्लीला गेला आणि महिपाल मात्र राजस्थानमध्येच राहिला.
-
१९ व्या वर्षी महिपाल हा राजस्थानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार झाला.
-
महिपाल हा फलंदाजांमध्ये गिलक्रिस्टला आदर्श मानतो.
-
तर गोलंदाजीमध्ये महिपालचा आदर्श आहे, रवींद्र जडेजा.
-
वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत महिपाल राजस्थानसाठी ३३ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळला आहे.
-
महिपालने या ३३ सामन्यांमध्ये ३९ च्या सरासरीने १९५३ धावा केल्यात.
-
अ दर्जाच्या सामन्यांमध्ये महिपालची सरासरी ४२ इतकी आहे.
-
आयपीएलमध्ये आधी महिपालला दिल्लीच्या संघाने विकत घेतलं होतं. मात्र त्याला प्रत्यक्षात सामना खेळ्याची संधी मिळाली नव्हती.
-
त्यानंतर महिपालला राजस्थानच्या संघाने विकत घेतलं.
-
महिपालने राजस्थानकडून खेळताना आयपीएलमध्ये १३७ च्या सरासरीने १३० धावा केल्यात.
-
क्रिकेटबरोबरच महिपाल हा सोशल नेटवर्किंगवर फार सक्रिय आहे.
-
महिपाल सोशल नेटवर्किंगवर स्वत:चे बरेच फोटो पोस्ट करत असतो.
-
कधी प्रॅक्टीस सेशनमधील मजा-मस्तीचे फोटो तो पोस्ट करतो.
-
तर कधी जीममध्ये व्यायाम करतानाचे फोटो तो पोस्ट करत असतो.
-
महिपालला व्यायामाची फार आवड आहे.
-
त्याच्या जीममधील फोटोंना हजारोच्या संख्येने लाइक्स असतात.
-
महिपालने आपल्या छोट्याश्या करियरमध्ये अल्पावधीतच स्वत::चा असा चाहता वर्ग निर्माण केलाय.
-
आता दुसऱ्या पर्वातील या पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केल्याने महिपालकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
-
त्यामुळे आता महिपाल पुढील स्पर्धा कसा खेळतो हे औत्सुक्याचे ठरणार आहे. महिपालसाठी राजस्थानने यंदाच्या हंगामामध्ये २० लाख रुपये मोजले आहेत.
-
लवकरच हा तरुण खेळाडू भारताच्या मुख्य संघात दिसेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांनाही आहे.
IPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…
कपडे धुण्याच्या धोक्याने खेळण्यापासून ते आज ‘भारताचा ख्रिस गेल’ अशी ओळख मिळवणाऱ्या खेळाडूचा प्रवास आज आपण या गॅलरीमधून पाहणार आहोत.
Web Title: Ipl 2021 journey of rajasthan royals mahipal lomror scsg