-
कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या पर्वाची धडाकेबाज सुरुवात केलीय. पहिल्यांनी त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर एकहाती विजय मिळवला आणि त्यानंतर गुरुवारी पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा दारुण पराभव केला. या विजयामध्ये मागील विजयाप्रमाणे पुन्हा एकदा वेंकटेश अय्यरने महत्वाची भूमिका बजावली.
-
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. मागील दोन सामन्यांमधील कामगिरीने प्ले ऑफमध्ये जाण्याची संघाची आशा कायम आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात राहुल त्रिपाठी (नाबाद ७४) आणि वेंकटेश अय्यर (५३) या युवा फलंदाजांच्या अर्धशतकांमुळे कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर ७ गडी आणि २९ चेंडू राखून मात केली. या विजयामध्ये वेंकटेश अय्यरने दिलेली सलामी फार मोलाची ठरली.
-
वेंकटेश तसा मागील दोन सामन्यांपासून संघासाठी सलामीला आला असून दोन्ही सामन्यांमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केलीय. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या मुंबईविरोधात ३० चेंडूत ५३ तर आरसीबीविरोधात २७ चेंडूत ४१ धावा ठोकल्यात.
-
वेंकटेश अय्यरची फलंदाजी पाहून क्रिकेट चाहते त्याच्या प्रेमात पडलेत. दोन्ही सामन्यांमध्ये वेंकटेशचा स्ट्राइकरेट हा १५० हून अधिक राहिला आहे. तसेच त्याने मुंबईविरोधातील सामन्यामध्ये षटकार मारुन आपलं खातं उघडलं होतं.
-
बुमराह आणि बोल्ट तसेच अॅडम मिल्नसारख्या अव्वल दर्जाच्या गोलंदाजांच्या गोलंदाजीची वेंकटेशनं पिसं काढली.
-
वेंकटेश असाच खेळत राहिला तर तो लवकरच भारतीय संघात दिसेल असंही म्हटलं जात आहे. वेंकटेशचं भविष्य उज्वल दिसत आहे. असं असलं तर त्याच्या भविष्याबद्दल सर्वात आधी भाष्य तो केवळ सात महिन्याचा असताना करण्यात आलं होतं.
-
वेंकटेशची आई उषा यांनी नुकतीच क्रिकबझला एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी आपला मुलगा कुटुंबाचं नाव मोठं करेल अशी भविष्यवाणी एका टॅक्सी चालकाने केल्याची आठवण करुन दिली.
-
उषा यांनी दिलेल्या माहितीनुसार वेंकटेश केवळ सात महिन्यांचा असताना त्या त्याला घेऊन भोपाळवरुन देवासला जाताना हा प्रकार घडलेला.
-
वेंकटेशची आई त्याला मांडीवर घेऊन टॅक्सीच्या पुढल्या सीटवर बसली होती. त्यावेळी टॅक्सीचालक वारंवार वेंकटेशकडे बघत होता.
-
नंतर उषा या आपल्या गंतव्यस्थानी पोहचल्यानंतर बाळाला घेऊन टॅक्सीतून उतरल्या तेव्हा त्या टॅक्सीचालकाना त्यांना, हा मुलगा तुमचं नाव मोठं करेल असं म्हटलं होतं. आज वेंकटेशने हे करुन दाखवल्याचं उषा यांनी मुलाखतीत सांगितलं.
-
वेंकटेशने आरसीबीविरोधात मैदानात तुफान फटकेबाजी करत असतानाच उषा यांना या प्रसंगाची आठवण झाली.
-
विशेष म्हणजे नाणेफेक झाली तेव्हा केकेआरचा कर्णधार इयन मॉर्गनने वेंकटेश अय्यर कोलकात्याकडून पदार्पण करत असल्याची माहिती दिली नव्हती. आपला मुलगा आजच्या सामन्यातही खेळणार नाही असं उषा यांना वाटलं.
-
मात्र ऑफिसमधून घरी आल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा संघात असल्याचं समजलं. वेंकटेशची कामगिरी पाहून उषा यांना फार आनंद झाला.
-
मुंबईविरोधातही वेंकटेशने आपल्या फलंदाजीची झकल दाखवत संघाला विजय सोपा करुन दिला. वेंकटेश नक्कीच भारतीय संघामध्येही खेळेल असं उषा सांगतात.
-
आता वेंकटेश पुढील सामन्याकडे कसा खेळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)
वेंकटेशला खेळताना पाहून त्याच्या आईला झाली ‘त्या’ टॅक्सीवाल्याची आठवण; म्हणाल्या, “तो म्हणालेला…”
वेंकटेश मागील दोन सामन्यांपासून संघासाठी सलामीला आला असून दोन्ही सामन्यांमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केलीय.
Web Title: Ipl 2021 kkr venkatesh iyer mother reminds an taxi driver said your son will achieve big feat in future scsg