-
ख्रिस गेलने टी २० विश्वचषकात दोन वेळा शतक झळकावलं आहे. २००७ आणि २०१६ च्या वर्ल्डकपमध्ये त्याने ही किमया साधली आहे. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५७ चेंडूत ११७ धावांची खेळी केली होती. यात ७ चौकार आमि १० षटकारांचा समावेश आहे. त्यानंतर २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी केली होती. ४८ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या होत्या. यात ५ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश आहे. (फोटो- Reuters)
-
टी २० विश्वचषकात शतक झळकवणारा सुरेश रैना एकमेव खेळाडू आहे. २०१० च्या विश्वचषकात रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६० चेंडूत १०१ धावा केल्या आहेत. या खेळीत ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे( फोटो- AP)
-
श्रीलंकेच्या महेला जयवर्धने २०१० मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध ६४ चेंडूत १०० धावांची खेळी केली होती. या खेळीत १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. (फोटो- Indian Express)
-
न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्कुल्लुमने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात १२३ धावांची वादळी खेळी केली होती. २०१२ च्या विश्वचषकात ५८ चेंडूत १२३ धावा केल्या आहेत. यात ११ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. ( फोटो- AP)
-
इंग्लंडच्या एलेक्स हेल्सने २०१४ साली श्रीलंकेविरुद्ध ११६ धावांची नाबाद खेळी होती. या खेळीत ११ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. ( फोटो- AP)
-
पाकिस्तानच्या अहमद शेहजादने २०१४ या वर्षात बांगलादेशविरुद्ध नाबाद १११ धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीत १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. ( फोटो- AP)
-
बांगलादेशच्या तमीम इक्बालने ओमान विरुद्ध खेळताना शतक झळकावलं आहे. २०१६ सालच्या विश्वचषकात ६३ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या होत्या. या खेळीत १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. (फोटो- Reuters)
T20 वर्ल्डकपमध्ये शतक झळकावणारे खेळाडू; ‘या’ खेळाडूने दोन वेळा साधली किमया
टी २० विश्वचषकात आतापर्यंत ७ जणांनी शतकी खेळी केली आहे. यात बांगलादेशच्या खेळाडूचाही समावेश आहे.
Web Title: Players scoring centuries in the t20 world cup rmt