-
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण ८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. त्यात भारताने ७ आणि पाकिस्ताने फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. (Photo- AP)
-
टी २० वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघात पाच सामने झाले आहेत. पाचही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. २००७ मध्ये खेळल्या गेल्या पहिल्या टी २० सामन्यता भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करत विश्वचषकावर नाव कोरलं होतं. (Photo- Reuters)
-
पाकिस्तानविरुद्धच्या टी २० सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक २५४ धावा केल्या आहेत.(Photo- संग्रहित)
-
पाकिस्तानकडून भारताविरुद्ध खेळताना टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात शोएब मलिकने १६४ धावा केल्या आहेत.(Photo- AP)
-
पाकिस्तानकडून खेळताना वेगवान गोलंदाज उमर गुलने भारताविरुद्ध ११ गडी बाद केले आहेत.(Photo- PTI)
-
पाकिस्तान विरुद्ध खेळताना इरफान पठाणने तीन सामन्यात ६ गडी बाद केले आहेत. (Photo- Indian Express)
India Vs Pakistan: टी २० मधील आतापर्यंतचा रेकॉर्ड; सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ‘या’ खेळाडूच्या नावावर
आयसीसी टी-२० विश्वचषक-२०२१ स्पर्धेमध्ये आज भारत आपल्या मोहिमेची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे
Web Title: T20 records between india vs pakistan rmt