-
टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताचं उपांत्य फेरीतचं स्वप्न भंगल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडलाय.
-
भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीसाठी अपात्र ठरल्यानंतर भारतीय संघ नेटकऱ्यांच्या रडारवर आलाय.
-
भारतीय क्रिकेट चाहते अनेक भन्नाट मीम्स पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त करत आहे.
-
सेलिब्रेटी देखील मीम्स टाकण्यात मागे नाही. भारतीय क्रिकेटर वसीम जाफरने देखील एक मीम टाकत भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानमधील उपांत्य फेरीतील चुरशीवर टोला लगावणारं मीम पोस्ट केलंय
-
विशेष म्हणजे या मीम्समध्ये मराठी मीम्सचंही प्रमाण मोठं आहे.
-
मराठी क्रिकेट चाहते देखील या सामन्याच्या निमित्ताने उपरोधिक टोले लगावत आहेत.
-
भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरच्या प्रतिक्रियेवरही मीम बनवण्यात आलंय.
-
न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाला मुंबई विमानतळावर परण्याशिवाय पर्याय नाही अशा आशयाचं मीमही शेअर केलं जातंय.
-
अफगाणिस्तानच्या विकेट जात असताना भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही वाईट होतं. त्यामुळे त्यावरही मीम्समधून निशाणा साधण्यात आला.
-
या सामन्याच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट चाहते अफगाणिस्तानच्या संघाला पाठिंबा देताना दिसल्यानं त्यावरही मीम पोस्ट करण्यात आलंय.
T20 WC: उपांत्य फेरीचं स्वप्न भंगल्यानंतर टीम इंडिया नेटकऱ्यांच्या रडारवर; शेअर केले भन्नाट मीम्स
टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताचं उपांत्य फेरीतचं स्वप्न भंगल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडलाय. भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीसाठी अपात्र ठरल्यानंतर भारतीय संघ नेटकऱ्यांच्या रडारवर आलाय. भारतीय क्रिकेट चाहते अनेक भन्नाट मीम्स पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त करत आहे.
Web Title: Memes on social media about t20 world cup 2021 new zealand afghanistan pbs