-
भारतीय क्रिकेटमध्ये आज म्हणजेच १७ नोव्हेंबरपासून रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या नव्या कर्णधार-प्रशिक्षक जोडीच्या पर्वाला प्रारंभ होईल.
-
टी-२० विश्वचषकातील अपयश मागे सारून जयपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने भारताचे खेळाडू मैदानात उतरतील. मात्र त्यापूर्वी मंगळवारी या खेळाडूंनी जयपूरच्या मैदानामध्ये कसून सराव केला.
-
कोहली, शिखर धवन यांसारख्या प्रमुख फलंदाजांच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर या युवा फळीच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल.
-
रोहितच्या साथीने महाराष्ट्राचा ऋतुराज सलामीला येण्याची शक्यता असून मुंबईकर सूर्यकुमार यादवचे मधल्या फळीतील स्थान पक्के मानले जात आहे.
-
मंगळवारी पहिल्यांदाच भारतीय संघाने द्वविडच्या नेतृत्वाखाली मैदानामध्ये सराव केला.
-
यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंबरोबरच या स्पर्धेमधून वगळलेले पण न्यूझीलंडविरोधातील मालिकेसाठी निवड झालेले खेळाडूही मैदानामध्ये सरावादरम्यान दिसून आले.
-
गोलंदाजांनीही यावेळी सराव केल्याचं पहायला मिळालं.
-
सराव करण्याबरोबरच अनेक खेळाडू आपआपसामध्ये चर्चा करताना दिसत होते.
-
द्रविडकडून अनेकांनी खेळ सुधारण्यासंदर्भातील विशेष टीप्स घेतल्याचं सरावाच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळालं.
-
द्रविडने फलंदाजांना सराव करण्यासाठी मदत केल्याचं पहायला मिळालं. द्रविडने नेट्समध्ये फलंदाजांकडून सराव करुन घेताना स्वत: त्यांना चेंडू टाकले.
-
द्रविडच्या गोलंदाजीवर रोहितच्या सरावाचा व्हिडीओ बीसीसीआयने पोस्ट केलाय.
-
‘आयपीएल’मध्ये आपल्या कल्पक नेतृत्वाने मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपदाचा किताब मिळवून देणारा रोहित आणि युवा खेळाडूंना पैलू पाडण्यात पटाईत असलेला द्रविड यांची जोडी भारतासाठीही मोलाचे योगदान देईल, अशी तमाम चाहत्यांना अपेक्षा आहे.
Photos: द्रविड सरांच्या गोलंदाजीवर रोहितचा सराव, ऋतूराजसोबत पंत, ईशानची ‘क्रिकेट पे चर्चा’ अन्…
रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या नव्या कर्णधार-प्रशिक्षक जोडीच्या पर्वाला आजच्या सामन्यापासून होणार सुरुवात
Web Title: Team india first practice session in jaipur scsg