-
जेव्हा जेव्हा भारत आणि वेस्ट इंडीजचे खेळाडू (IND vs WI) एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतात, तेव्हा प्रत्येकाला दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण पाहायला मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे आयपीएलमध्ये भारताच्या खेळाडूंसोबत खेळणारे वेस्ट इंडीजचे खेळाडू.
-
वेस्ट इंडीजचे खेळाडू या लीगचे नेहमीच आकर्षण राहिले आहेत आणि त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चांगले नाते पाहायला मिळते. अहमदाबादमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर असेच काहीसे बाँडिंग पाहायला मिळाले.
-
पाहुण्या वेस्ट इंडीजने भारताविरुद्धचा पहिला वनडे सामना गमावला, परंतु नंतर खेळाडूंनी भारतीय खेळाडूंसोबत फोटोसाठी पोज दिल्या आणि एकमेकांशी चर्चा करताना दिसले.
-
सामन्यानंतर वेस्ट इंडीज क्रिकेटने ट्विटरवर दोन्ही देशांच्या खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना वेस्ट इंडिजचा संघ १७६ धावांवर ऑलआऊट झाला.
-
प्रत्युत्तरात भारताने २८ षटकांत ४ गडी गमावत हा सामना जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया १-०ने आघाडीवर आहे.
PHOTOS : टीम इंडिया आणि वेस्ट इंडीजच्या खेळाडूंचा ‘ब्रोमान्स’ पाहिला का?
पहिला वनडे सामना संपल्यानंतर दोन्ही देशांचे खेळाडू एकमेकांसोबत मजा-मस्करी करताना दिसले.
Web Title: India and west indies players bonding after first odi watch photos adn