-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई संघ खास कामगिरी करु शकलेला नाहीये.
-
मात्र या संघातील ऋतुराज गायकवाड चांगला फॉर्ममध्ये आहे.
-
त्याने एक अनोखी कामगिरी केली असून क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरलादेखील मागे टाकलं आहे.
-
त्याने १ मे रोजी हैदरबादविरोधातील सामन्यामध्ये ९९ धावा करत धमाकेदार फलंदाजी केली.
-
त्याने या सामन्यामध्ये आयपीएलमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या.
-
तो भारतीय खेळाडूंमध्ये सर्वात कमी डावांत म्हणजेच ३१ डावांमध्ये एक हजार धावांचा टप्पा गाठणारा खेळाडू ठरला आहे.
-
सचिन तेंडुलकरनेही ३१ डावांमध्ये एक हजार धावा केलेल्या आहेत. ३१ डावांमध्ये सचिनने १०६४ केलेल्या आहेत.
-
तर ऋतुराजने ३१ डावांत १०७६ धावा केल्या. म्हणजेच ३१ डावांत एक हजार धावा करताना ऋतुराजने सचिनपेक्षा १२ धावा जास्त केल्या.
-
एक हजार धावांचा टप्पा गाठताना ऋतुराजने सचिनला अशा प्रकारे मागे टाकले.
ऋतुराज गायकवाडने केली मोठी कामगिरी, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
ऋतुराज गायकवाडने भारतीय खेळाडूंमध्ये सर्वात कमी डावांत म्हणजेच ३१ डावांमध्ये एक हजार धावांचा टप्पा गाठला आहे.
Web Title: Csk player ruturaj gaikwad ahead of sachin tendulkar made one thousand runs in 31 innings prd