-
भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर आणि जया भारद्वाज २ जून रोजी लग्नबंधनात अडकले.
-
आग्र्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.
-
शनिवारी रात्री दिल्लीमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
-
या रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी हजेरी लावली.
-
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दीपक आणि जयाला शुभेच्छा दिल्या.
-
यष्टीरक्षक ऋषभ पंत दीपकच्या रिसेप्शन सोहळ्यात उपस्थित होता.
-
चेन्नईचा खेळाडू अंबाती रायडू आपल्या पत्नीसह उपस्थित राहिला.
-
भुवनेश्वर कुमारने सपत्नीक नवीन जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
-
युवा खेळाडू ईशान किशनने नवरदेवाप्रमाणे काळ्या रंगाचे कपडे घालून पार्टीत प्रवेश केला.
-
शार्दुल आणि ऋषभला नवीन जोडप्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
-
रिसेप्शन पार्टीमध्ये आलेल्या मित्रांसोबत दीपक गप्पा मारताना दिसला.
-
माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रादेखील रिसेप्शन पार्टीला उपस्थित होते.
-
जयाच्या मित्र-मैत्रीणीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
-
आपल्या रिसेप्शन पार्टीमध्ये दीपक चहर मनसोक्त नाचला.
-
सुरेश रैना, पियुष चावला या क्रिकेटपटूंनी दीपकच्या पार्टीमध्ये धमाल केली. (सर्व फोटो सौजन्य – दीपक आणि जया इन्स्टाग्राम)
दीपक चहरच्या रिसेप्शन पार्टीत क्रिकेटपटूंची मांदियाळी, बघा फोटो
आयपीएलच्या १४व्या हंगामादरम्यान दीपकने जयाला जाहीरपणे लग्नाची मागणी घातली होती. तेव्हापासून जगभरातील क्रिकेट चाहते या दोघांच्या लग्नाची वाट बघत होते.
Web Title: Cricket fraternity attends deepak chahar and jaya bhardwaj wedding reception vkk