-
क्रिकेट हा फुटलबॉलनंतरचा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटमधून आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू मिळाले आहेत.
-
काही खेळाडूंच्या तर मुलांनीदेखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे.
-
जेक लेहमन – जेक लेहमन हा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांचा मुलगा आहे. वडिलांप्रमाणेच जेक लेहमन हा देखील डावखुरा फलंदाज आहे. (फोटो सौजन्य – विस्डेन)
-
समित द्रविड – राहुल द्रविडचा मुलगा असलेल्या १६वर्षीय समितने ज्युनिअर लेव्हल क्रिकेटमध्ये चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
तेगनरिन चंद्रपॉल – तेगनरिन चंद्रपॉल हा वेस्ट इंडिजचा महान फलंदाज शिवनरिन चंद्रपॉलचा मुलगा आहे. तेगरनरिनने अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले होते. (फोटो सौजन्य – न्यूज १८)
-
टँडो नटिनी – टँडो हा दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू मखाया नटिनीचा मुलगा आहे. टँडो वेगवान गोलंदाज आहे. (फोटो सौजन्य – क्रिकबझ)
-
वेदांत सेहवाग – आपले वडील आणि भाऊ आर्यवीर यांच्याप्रमाणे वेदांतदेखील क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अन्वय द्रविड – राहुल द्रविडचा दुसरा मुलगा अन्वयदेखील वडिल आणि भावाप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे. (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
आर्यन बांगर – माजी भारतीय खेळाडू असलेल्या संजय बांगर यांचा मुलगा आपल्या वडिलांप्रमाणे अष्टपैलू खेळाडू आहे. (फोटो सौजन्य – क्रिकेट अॅडिक्टर)
-
अर्जुन तेंडुलकर – दिग्गज भारतीय क्रिकेटपटू असलेल्या सचिनचा मुलगा अर्जुन एक अष्टपैलू खेळाडू आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
आर्यवीर सेहवाग – आर्यवीर हा स्फोटक भारतीय फलंदाज विरेंद्र सेहवागचा थोरला मुलगा आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
ऑस्टिन वॉ – ऑस्टिन वॉ हा ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टिव्ह वॉचा मुलगा आहे. त्याने आपल्या कुटुंबाचा क्रिकेटचा वारसा पुढे चालवण्याचा निर्णय घेत क्रिकेट खेळवण्यास सुरुवात केली. (फोटो सौजन्य – ईएसपीएन क्रिकइन्फो)
‘या’ क्रिकेटपटूंच्या मुलांनी वडिलांच्या पावलावर ठेवले पाऊल
काही क्रिकेटपटूंच्या मुलांनीदेखील क्रिकेटला पसंती दिली आहे.
Web Title: Know about the father son cricketer duos vkk