• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. bcci chetan sharma sting operation rohit sharma virat kohli and saurabh ganguly doping rmm

विराटला कर्णधारपदावरून कसं हटवलं? रोहितशी संबंध कसे? फीट राहण्यासाठी खेळाडू इंजेक्शन घेतात का? स्टिंग ऑपरेशनमधून अनेक खुलासे

बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचं स्टिंग ऑपरेशन केलं आहे.

Updated: February 15, 2023 09:31 IST
Follow Us
  • भारतीय फलंदाज विराट कोहली याचं काही दिवसांपूर्वी एकदिवसीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं होतं.
    1/18

    भारतीय फलंदाज विराट कोहली याचं काही दिवसांपूर्वी एकदिवसीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं होतं.

  • 2/18

    विराट कोहलीला असं अचानक कर्णधारपदावरून हटवल्याने क्रिकेटविश्वाला धक्का बसला होता.

  • 3/18

    विराटला कर्णधार पदावरून हटवणारा खरा मास्टरमाइंड कोण होता? याचा खुलासा एका स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे.

  • 4/18

    बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचं ‘झी न्यूझ’ने स्टिंग ऑपरेशन केलं आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

  • 5/18

    बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याबरोबर विराट कोहलीचा वाद होता. या वादातूनच विराटला कर्णधार पदावरून काढण्यात आलं, असा दावा चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये केला आहे.

  • 6/18

    कोहली आणि गांगुली यांच्यात अहंकाराचा वाद होता. स्वत:चं कर्तृत्व क्रिकेटपेक्षा मोठं आहे, असं विराटला वाटत होतं. यामुळे दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली.

  • 7/18

    ८ डिसेंबर २०२१ रोजी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने संघाची घोषणा केली होती. यावेळी विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून त्याला हटवलं होतं.

  • 8/18

    विराटच्या जागी रोहितला कर्णधार पद दिलं होतं. संघ जाहीर करण्याच्या दीड तास आधी आपल्याला कर्णधार पदावरून हटवलं आहे, याची माहिती विराटला देण्यात आली. याचा खुलासा कोहलीने स्वत: एका पत्रकार परिषदेतून केला आहे.

  • 9/18

    चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट आणि रोहित यांच्यातील संबंधावर भाष्य केलं.

  • 10/18

    दोघांमध्ये कसलाही वाद नसून विराट आणि रोहित दोघं एकमेकांना चांगली साथ देतात.

  • 11/18

    दोघांत वाद असल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येतात.

  • 12/18

    पण विराटचा फॉर्म खराब असताना रोहितने त्याला चांगली साथ दिली होती.

  • 13/18

    दुसरीकडे रोहितचा फॉर्म खराब असताना विराटही त्याला साथ देत होता, असा दावा चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये केला आहे.

  • 14/18

    एवढंच नव्हे तर भारतीय खेळाडू स्वत: फीट ठेवण्यासाठी डोपिंग अर्थात उत्साहवर्धक इंजेक्शन्स घेतात, असा दावा चेतन शर्मांनी केला.

  • 15/18

    खेळाडू इंजेक्शन घेत असल्याचं बीसीसीआयला ज्ञात आहे, पण याकडे क्रिकेट मंडळाकडून कानाडोळा केला जात आहे, असंही चेतन शर्मांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हटलं.

  • 16/18

    वरील कोणत्याही दाव्याची पुष्टी लोकसत्ता करत नाही.

  • 17/18

    चेतन शर्मा यांच्यावरील स्टिंग ऑपरेशनमुळे बीसीसीआय वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

  • 18/18

    सर्व फोटो- इंडियन एक्स्प्रेस/ लोकसत्ता

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Bcci chetan sharma sting operation rohit sharma virat kohli and saurabh ganguly doping rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.