• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. asia cup trophy lifted by special man raghu raghavendra not rohit sharma or jay shah who is this throw down specialist svs

Asia Cup: रोहित शर्मा व जय शाह यांच्याआधी ‘आशिया चषक’ उचलण्याचा मान ‘या’ व्यक्तीला; वाचून वाटेल अभिमान

Asia Cup IND Vs SL: आशिया चषकाच्या विजयानंतर ग्राउंड स्टाफसाठी बक्षीस देण्यापासून ते ट्रॉफी उचलण्याचा मान ‘या’ खास व्यक्तीला देण्यापर्यंत भारताने अनेकांची मनं जिंकणाऱ्या गोष्टी केल्या आहेत.

Updated: September 18, 2023 16:39 IST
Follow Us
  • Asia Cup Trophy Lifted By Special Man Raghu Raghavendra Not Rohit Sharma or Jay Shah Who is This Throw Down Specialist
    1/9

    भारत विरुद्ध श्रीलंका या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अप्रतिम गोलंदाजी करत २१ धावांत ६ बळी घेतले होते. याच बळावर भारताने आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेवर १० गडी राखून भारताच्या विजयाचा पाया रचला.

  • 2/9

    Asia Cup IND Vs SL: आशिया चषकाच्या ट्रॉफी सेलिब्रेशन दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या अनेक खेळाडूंनी ट्रॉफी उचलली. २० वर्षीय तिलक वर्मा हा ट्रॉफी उचलणारा पहिला खेळाडू होता. भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात तरुण किंवा नवीन खेळाडूला इतरांसमोर ट्रॉफी उचलण्याची संधी देण्याची ही परंपरा आहे.

  • 3/9

    तिलकनंतर मात्र एका खास व्यक्तीला आशिया कप उचलण्याचा मान दिला होता. ही व्यक्ती म्हणजे रघु राघवेंद्र

  • 4/9

    रघु राघवेंद्र हे टीम इंडियाच्या संघात ‘थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट’ आहेत. भारतीय फलंदाजांना स्लिंगरने नेटवर थ्रो-डाउन देणे हे त्याचे काम आहे. रघुशिवाय आणखी दोन जणांची या कामासाठी नियुक्ती झाली आहे

  • 5/9

    विराट कोहलीने यापूर्वी या सर्व थ्रो- डाऊन स्पेशालिस्टचे कौतुक केले होते. कोहली म्हणाला होता की, “त्यांच्यामुळेच आम्हा फलंदाजांना सराव मिळतो, लोकांनी या सगळ्यांचे नाव व चेहरे लक्षात ठेवायला हवेत कारण आमच्या यशासाठी यांनी खूप मेहनत घेतली आहे.”

  • 6/9

    रघु राघवेंद्र, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधून बीसीसीआयमध्ये जोडला गेला होता. तो भारताचा पहिला थ्रो-डाउन स्पेशालिस्ट आहे

  • 7/9

    रघु राघवेंद्र याने सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनीलाही थ्रो-डाउन दिले आहेत

  • 8/9

    दुसरीकडे, रविवारी श्रीलंकेला ५० धावांत गुंडाळल्यानंतर, भारतीय कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजांचे खूप कौतुक केले होते. संघात विविधता अत्यंत महत्त्वाची असते ज्यामुळे हे शक्य झालं असंही रोहित शर्मा म्हणाला

  • 9/9

    रोहित शर्माने सांगितलं की, आशिया चषक २०२३ मधून संघ म्हणून जे काही साध्य करू शकलो ते सर्व केलं आहे. आता आम्ही फक्त भारतात येऊ घातलेल्या मालिकेची आणि त्यानंतर विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहत आहोत.

  • ( सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/ट्विटर)
TOPICS
आशिया चषक २०२४Asia Cup 2023मराठी बातम्याMarathi Newsरोहित शर्माRohit Sharma

Web Title: Asia cup trophy lifted by special man raghu raghavendra not rohit sharma or jay shah who is this throw down specialist svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.