-
यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स काही विशेष कामगिरी करू शकलेली नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना गमावून संघाने पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. या पराभवावर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने पराभवाचे प्रमुख कारण सांगितले आहे. (Photo: mumbaiindians/Instagram)
-
काल म्हणजेच १ एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवून मुंबई आपल्या परभवाचे सत्र थांबावेल अशी अपेक्षा होती. परंतु राजस्थानने मुंबईचा वाईट पद्धतीने पराभव केला. (Photo: rajasthanroyals/Instagram)
-
दरम्यान, मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्याला सातत्याने चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत असून सामन्यानंतर हार्दिकने या पराभवाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. संघाकडून कुठे चुका होत आहेत, याबाबतही हार्दिकने सांगितले. (Photo: mumbaiindians/Instagram)
-
या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने संघाकडून आणि त्याच्याकडून झालेल्या अनेक चुका कबूल केल्या आहेत. हार्दिक म्हणाला की तो बाद झाल्यामुळे राजस्थानला सामन्यात पुनरागमन करता आले. (Photo: mumbaiindians/Instagram)
-
मुंबईने दिलेल्या १२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने १५.३ षटकांत चार बाद १२७ धावा करून विजय मिळवला. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव असून तो अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा करत आहे. (Photo: rajasthanroyals/Instagram)
-
युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर मुंबईचा संघ नऊ विकेट्सवर १२५ धावाच करू शकला. वेगवान गोलंदाज नांद्रे बर्जरनेही ३२ धावांत दोन बळी घेतले. (Photo: rajasthanroyals/Instagram)
-
याउलट कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा वगळता मुंबईचा एकही फलंदाज जास्त वेळ मैदानात तग धरू शकला नाही. (Photo: mumbaiindians/Instagram)
-
सामन्यानंतर हार्दिक म्हणाला, “आम्ही हवी तशी सुरुवात करू शकतो नाही. मला वाटते की आम्ही १५०-१६० पर्यंत पोहोचण्याच्या चांगल्या स्थितीत होतो, परंतु माझ्या विकेटने खेळ बदलला आणि राजस्थानने सामन्यात चांगला जम बसवला. मला वाटते की मी आणखी चांगले करू शकलो असतो.” (Photo: mumbaiindians/Instagram)
-
हार्दिक पुढे म्हणाला, “एक संघ म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही बरेच चांगले करू शकतो, परंतु आम्हाला आणखी शिस्तबद्ध राहण्याची आणि खूप धैर्य दाखवण्याची गरज आहे.” (Photo: mumbaiindians/Instagram)
-
मुंबईच्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर हार्दिक आणि तिलक वर्मा वगळता सर्वांनी खराब फलंदाजी केली. आघाडीच्या तीन फलंदाजांना खाते उघडण्यातही यश आले नाही. (Photo: rajasthanroyals/Instagram)
-
रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस यांना ट्रेंट बोल्डने शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. तिलक वर्मा आणि हार्दिक यांच्या जोरावर संघाला एकूण १२५ धावा करता आल्या. (Photo: rajasthanroyals/Instagram)
IPL 2024 MI vs RR: मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवासाठी जबाबदार कोण? कॅप्टन हार्दिक पंड्या म्हणतो, “मला वाटतं…”
मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्याला सातत्याने चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत असून सामन्यानंतर हार्दिकने या पराभवाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
Web Title: Ipl 2024 mi vs rr who is responsible for mumbai indians third straight defeat captain hardik pandya says i thought pvp