• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. llc 2024 6 teams captain shikhar dhawan suresh raina ian bell irfan pathan captain t20 world champion vbm

LLC 2024 : ६ संघांच्या कर्णधारांमध्ये ३ T20 वर्ल्ड चॅम्पियन्सचा समावेश, जाणून घ्या कोणाला मिळाली नेतृत्त्वाची संधी?

लेजेंड्स लीग क्रिकेट 2024 मध्ये भारताचे अनेक महान खेळाडू दिसणार आहेत.

September 20, 2024 18:11 IST
Follow Us
    LLC 2024 Updates : लेजेंड्स लीग क्रिकेट २०२४ मध्ये भारताचे अनेक महान खेळाडू खेळताना दिसणार आहेत. ज्यामध्ये शिखर धवन, इरफान पठाण आणि दिनेश कार्तिकसारख्या खेळाडूंचा समावेश आहे
    लेजेंड्स लीग क्रिकेटचे पर्व लवकरच सुरू होणार आहे. लीगने सहा संघ तसेच त्यांच्या कर्णधारांची घोषणा केली आहे. या सहा कर्णधारांपैकी पाच भारतीय आहेत. तीन टी-२० वर्ल्ड चॅम्पियन्सही आहेत.
  • 1/7

    गुजरात ग्रेट्सचे कर्णधारपद शिखर धवनकडे सोपवले आहे. शिखर धवनने ६८ टी-२०सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर १७५९ धावा आहेत. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या ९२ आहे. (फोटो सौजन्य- शिखर धवन इन्स्टाग्राम)

  • 2/7

    भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा दक्षिणेकडील सुपरस्टार्सचा कर्णधार आहे. त्याने ४०१ टी-२०सामने खेळले आहेत. कार्तिकने या सामन्यांमध्ये ७४०७ धावा केल्या आहेत. कार्तिक कधीही शतक करू शकला नाही, पण त्याने ३४ वेळा अर्धशतकी खेळी केलीआहे. दिनेश कार्तिक २००७ च्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियन संघाचा एक भाग होता. (फोटो सौजन्य- दिनेश कार्तिक इन्स्टाग्राम)

  • 3/7

    सुरेश रैना तोयम हैदराबादचा कर्णधार आहे. त्याने एकूण ३३६ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ८६५४ धावा आहेत. यामध्ये ४ शतके आणि ५३ अर्धशतकांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – सुरेश रैना इन्स्टाग्राम)

  • 4/7

    भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण कोणार्क सूर्य ओडिशाचा कर्णधार आहे. इरफान पठाणने १८१ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर २०२० धावा आहेत. इरफानने १७३ विकेट्स घेतल्या आहेत. तो २००७ च्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियन संघाचा एक भाग होता. (फोटो सौजन्य: इरफान पठाण इन्स्टाग्राम)

  • 5/7

    इयान बेलला इंडिया कॅपिटल्सचे कर्णधारपद मिळाले आहे. त्याने १०७ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २७९० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि १८ अर्धशतके आहेत. (फोटो सौजन्य – इयान बेल इन्स्टाग्राम)

  • 6/7

    हरभजन सिंग मणिपाल टायगर्सचे कर्णधारपद भूषवणार आहे. त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये २६८ सामने खेळले आहेत. ज्यात देशांतर्गत सामन्यांचाही समावेश आहे. हरभजन सिंगने २३५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एकदा पाच विकेट्स आणि तीन वेळा चार विकेट्स घेतल्या आहेत. तो २००७ च्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियन संघाचा एक भाग होता. (फोटो सौजन्य – हरभजन सिंग इन्स्टाग्राम)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsशिखर धवनShikhar Dhawan

Web Title: Llc 2024 6 teams captain shikhar dhawan suresh raina ian bell irfan pathan captain t20 world champion vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.