• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. t20 wc ind vs afg game was fixed or not these seven reasons are being trending adn

PHOTOS : भारत-अफगाणिस्तान मॅच होती फिक्स? ‘या’ ७ कारणांमुळं रंगतेय जोरदार चर्चा!

अबुधाबीच्या मैदानावर भारतानं अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव केला, त्यामुळे विराटसेनेला नेट रनरेटमध्ये फायदा झाला.

Updated: November 4, 2021 23:15 IST
Follow Us
  • टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने आपला पहिला विजय नोंदवला. अबुधाबीत रंगलेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ६६ धावांनी नमवले. या विजयानंतर अनेकांनी हा सामना फिक्स असल्याचे म्हटले. याची ७ कारणेही सोशल मीडियावर चर्चेत ठरू लागली आहेत.
    1/8

    टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने आपला पहिला विजय नोंदवला. अबुधाबीत रंगलेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ६६ धावांनी नमवले. या विजयानंतर अनेकांनी हा सामना फिक्स असल्याचे म्हटले. याची ७ कारणेही सोशल मीडियावर चर्चेत ठरू लागली आहेत.

  • 2/8

    १. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू मुजीब उर रहमान भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर होता. मागील सामन्यात कमाल प्रदर्शन केलेल्या मुजीबला अचानक दुखापत कशी झाली?, याची चर्चा रंगू लागली.

  • 3/8

    २. मुजीब खेळत नसला, तर कैस आणि नूर हे दोन फिरकीपटू संघात का नव्हते, यावरही बोट दाखवण्यात आले.

  • 4/8

    ३. जागतिक स्तरावर नाव कमावलेला फिरकीपटू राशिद खानने भारताविरुद्ध एकच स्पेल टाकला. पॉवरप्लेमध्ये त्याने का गोलंदाजी केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याने ४ षटकात एकही विकेट न घेता ३६ धावा दिल्या.

  • 5/8

    ४. भारताविरुद्ध अफगाणिस्तानने सुमार क्षेत्ररक्षण केले. नजीबउल्लाह झादरानने हार्दिक पंड्याचा सोपा झेल सोडला.

  • 6/8

    ५. भारताला अफगाणिस्तानसमोर मोठी धावसंख्या उभारता आली. गचाळ क्षेत्ररक्षण हेदेखील याचे एक कारण ठरले.

  • 7/8

    ६. अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने सामन्याच फक्त एक षटक गोलंदाजी केली. यात भारताला फक्त ७ धावा मिळाल्या. नबी हा चांगला गोलंदाज मानला जातो, असे असूनही त्याने एक षटक का टाकले, यावर चर्चा रंगते आहे.

  • 8/8

    ७. शराफुद्दीन अशरफ आणि नवीन उल हक यांनी अनुक्रमे १२ आणि १४च्या सरासरीने धावा खर्च केल्या. भारतीय फलंदाजांविरुद्ध त्यांनी नियंत्रित गोलंदाजी केली नाही. फटके मारता येऊ शकतील, असे चेंडू अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी खेळवल्याचे म्हटले जात आहे. (सर्व फोटो सोशल मीडिया आणि ट्विटरवरून साभार)

TOPICS
बीसीसीआयBCCI

Web Title: T20 wc ind vs afg game was fixed or not these seven reasons are being trending adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.