आयफोन ११ – अॅॅपलचा आयफोन ११ प्राइम डे विक्रीशिवाय देखील अँमेझॉनवर कमी किंमतीत उपलब्ध असतो. ६४ जीबी व्हेरिएंटसाठी ४७,९९९ रुपये आणि १२८ जीबी व्हेरिएंटसाठी ५३,९९९ रुपयांपासून फोन आहेत. (सर्व फोटो: फ्लिपकार्ट) रिअलमी एक्स ७ मॅक्स – रिअलमी एक्स ७ मॅक्स ८ जीबी / १२८ जीबी व्हेरिएंटसाठी २४,९९९ रुपयांच्या सवलतीच्या किंमतीवर उपलब्ध आहे. स्वस्त मेडियाटेक डायमेन्सिटी १२०० पावर फोनपैकी एक आहे. १२जीबी / २५६जीबी व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे. आयफोन एक्स आर- अँमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोघांवर आयफोन एक्सआर ३७,९९९ रुपयांपासून उपलब्ध आहे. याचा बेस ६४ जीबी व्हेरिएंट आहे. तर १२८ जीबी ची किंमत ४२,९९९ रुपये आहे. आयफोन एक्सआरमध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले, १२ एमपीचा सिंगल रियर कॅमेरा आणि अँपल ए १२ बायोनिक चिप देण्यात आली आहे. मोटो रझज़र ४ जी – फ्लिप होणारा मोटोरोला मोटो रझर ४ जी काळ्या रंगाच्या सिंगल ६ जीबी / १२८ जीबी व्हेरिएंटसाठी ५४,९९९ किंमतीसह उपलब्ध आहे. गोल्ड रंगाच्या व्हेरिएंटची किंमत ७४,९९९ रुपये आहे, तर ८ जीबी / २५७ जीबी कॉन्फिगरेशनसह नवीन ५ जी व्हेरिएंटची किंमत ८९,९९९ रुपये आहे. आयफोन १२ प्रो – आयफोन १२ प्रो ची किंमत १२८ जीबी व्हेरिएंटसाठी १,०५,९०० रुपये आणि २५७ जीबी व्हेरिएंटसाठी १,१५,९०० रुपये खाली आहे. आयफोन ११ ची ही मॉडेल्स स्टॉकमध्ये आहेत आणि तुम्ही अँमेझॉनवर प्राइम मेंबर असल्यास ताबडतोब खरेदी करता येतील. रियलमी नरझो ३० प्रो ५ जी – सध्या भारतात सर्वात स्वस्त ५ जी फोन उपलब्ध आहेत. रियलमी नरझो ३० प्रो ५ जी ६ जीबी / ६४जीबी व्हेरिएंटची किंमत १५,४९९ रुपये आहे. तर ८ जीबी / १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आहे. आयफोन १२ मिनी- कॉम्पॅक्ट आयफोन १२ मिनी आता फ्लिपकार्टवर बेस ६४ जीबी वेरियंटसह ५७,९९९ रुपयांच्या किंमतीपासून सुरू होत आहे, जी आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे. दरम्यान, १२८ जीबी व्हेरिएंट ६२,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ७२,९९९ रुपयांपासून सुरू आहे.
Amazon प्राईम डे, Flipkart बिग सेविंग डेज सेल; आयफोनसह १२ सह स्मार्टफोनवर मोठी सूट!
लॅपटॉप, स्मार्टफोन, प्रिंटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही ऑफर्स आणि सूट पाहायला मिळतील.
Web Title: Amazon prime days flipkart big savings days sale smartphones with the best discounts ttg