• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. the other person will not find your name on true caller just do it rmt

Tips And Tricks: ट्रू कॉलरवर आता दुसरा व्यक्ती आपलं नाव शोधू शकणार नाही; फक्त इतकं करा

Truecaller अ‍ॅप्लिकेशन भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या अ‍ॅपद्वारे अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलची माहिती मिळते.

November 18, 2021 18:23 IST
Follow Us
  • Truecaller अ‍ॅप्लिकेशन भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या अ‍ॅपद्वारे अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलची माहिती मिळते. ट्रू कॉलर अ‍ॅपमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत, जी वापरकर्त्यांना अनेक प्रकारच्या सुविधा देतात. (Photo- Indian Express/ प्रातिनिधीक फोटो)
    1/7

    Truecaller अ‍ॅप्लिकेशन भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या अ‍ॅपद्वारे अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलची माहिती मिळते. ट्रू कॉलर अ‍ॅपमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत, जी वापरकर्त्यांना अनेक प्रकारच्या सुविधा देतात. (Photo- Indian Express/ प्रातिनिधीक फोटो)

  • 2/7

    आपल्यापैकी बहुतेकांचे तपशील Truecaller च्या डेटाबेसमध्ये आधीच सेव्ह केलेले आहेत. या डेटाबेसद्वारे, अ‍ॅप अज्ञात क्रमांकावरून कॉल करणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती देतो. तुमचा नंबर टाकून कोणीही Truecaller च्या डेटा बेसवरून तुमची माहिती गोळा करू शकतो. (Photo- Indian Express/ प्रातिनिधीक फोटो)

  • 3/7

    तुम्ही हे अ‍ॅप कधी वापरले नसेल, तरीही या अ‍ॅपच्या मदतीने तुमचा नंबर टाकून तुमची माहिती गोळा करता येईल. अशा परिस्थितीत तुमचा तपशील काढून चुकीच्या हेतूंसाठी वापरला जाऊ शकतो. (Source: Pixabay)

  • 4/7

    तुम्ही Truecaller च्या डेटाबेसमधून तुमची माहिती हटवू शकता. Truecaller तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती हटवण्याचा पर्याय देतो. (Source: Pixabay)

  • 5/7

    तुमची वैयक्तिक माहिती हटवण्यासाठी तुम्हाला तुमचे Truecaller खाते निष्क्रिय करावे लागेल. त्यानंतरच तुमची वैयक्तिक माहिती Truecaller च्या डेटाबेसमधून काढून टाकली जाईल. तुम्ही खाते हटविल्याशिवाय तुमचे वैयक्तिक तपशील Truecaller वरून काढू शकत नाही. Truecaller तुम्हाला या संदर्भात दुसरा कोणताही पर्याय देत नाही. (Photo- Indian Express/ प्रातिनिधीक फोटो)

  • 6/7

    जर तुम्हाला Truecaller वरून तुमचे खाते हटवायचे असेल तर सर्वप्रथम Truecaller अॅप उघडा. आता तुम्हाला सेटिंग्जमध्ये खाते पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर Deactivate चा पर्याय निवडा. (Photo- Indian Express/ प्रातिनिधीक फोटो)

  • 7/7

    एकदा खाते निष्क्रिय झाल्यावर तुम्हाला https://www.truecaller.com/unlisting ला भेट द्यावी लागेल. आता तुम्हाला I’m not robot चा पर्याय निवडावा लागेल आणि unlist number वर क्लिक करावे लागेल. या प्रक्रियेच्या २४ तासांनंतर तुमचे नाव Truecaller च्या डेटाबेसमधून हटवले जाईल. (Photo- Indian Express/ प्रातिनिधीक फोटो)

TOPICS
टेक्नोलॉजी न्यूजTechnology News

Web Title: The other person will not find your name on true caller just do it rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.